AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona मुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार का? Ajit Pawar म्हणतात...

Corona मुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार का? Ajit Pawar म्हणतात…

| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 3:54 PM
Share

मुंबईत आज आढळून आलेल्या नव्या कोरोना रुग्णांनी पुन्हा धडकी भरवली आहे, कारण मुंबईत कोरोना रुग्णांची स्फोटक वाढ झाली आहे, काल एकाच दिवसात तब्बल 2 हजार 510 नवे कोरोना रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आल्याने प्रशासनाचे आणि सर्वसामान्य मुंबईकरांचे धाबे दणाणले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर भाष्य केलं आहे. कोरोना संसर्ग वाढत असून काळजी घेणं गरजेचं आहे. सर्वांनी मास्क लावण्याचे मी सांगत आहे. तसेच वर्ष संपत आलं आहे. वेगळ्या पद्धतीने कार्यक्रम चालतात. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरतोय. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. वेळ आली तर कठोर निर्बंध लावावे लागतील, असे अजित पवार म्हणाले.

मुंबईत आज आढळून आलेल्या नव्या कोरोना रुग्णांनी पुन्हा धडकी भरवली आहे, कारण मुंबईत कोरोना रुग्णांची स्फोटक वाढ झाली आहे, काल एकाच दिवसात तब्बल 2 हजार 510 नवे कोरोना रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आल्याने प्रशासनाचे आणि सर्वसामान्य मुंबईकरांचे धाबे दणाणले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उत्तम नियोजन आणि कोरोनाला रोखणारा मुंबई पॅटर्न जगभर गाजला मात्रा आता त्याच मुंबईला पुन्हा धडकी भरली आहे, कारण मुंबईसह राज्यावर, देशावर तिसऱ्या लाटेची टांगली तलवार आहे.