Mumbai : धक्कादायक.. महिला पायलटचा लैंगिक छळ; धावत्या कॅबमध्ये नको ते घडलं, 3 जणांवर गुन्हा, मुंबई हादरली
गुरूवारी घडलेल्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तिने तिच्या पतीला घटनेबद्दल सांगितले तेव्हा त्या जोडप्याने घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर तिघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आणि पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळतेय
मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडला ज्यानंतर मुंबई हादरली आहे. महिलांसाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ऑनलाइन कॅबमध्ये महिला पायलटचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून तीन जणांवर विनयभंग केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. महिलेच्या तक्रारीवरून उबर कॅबच्या चालकासह इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास ही महिला पायलट दक्षिण मुंबईहून घाटकोपर येथील तिच्या घरी परतत असताना ही घटना घडली. महिलेचा पती नौदलात अधिकारी आहे. गुरुवारी रात्री दक्षिण मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्यानंतर, तिच्या पतीने तिच्यासाठी उबर टॅक्सी बुक केली. महिलेच्या आरोपानुसार, प्रवासाच्या २५ मिनिटांत कॅब ड्रायव्हरने मार्ग बदलला आणि दोन लोकांना कॅबमध्ये चढू दिले. मागच्या सीटवर तिच्या शेजारी बसलेल्यांपैकी एकाने तिला नको तिथे स्पर्श केला. तिने विरोध केला तेव्हा तो माणूस तिच्यावर ओरडला आणि तिला धमकावले असं घडत असताना चालकाने कोणताही हस्तक्षेप केला नसल्याचे या महिलेने सांगितले.