AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhatrapati Sambhajinagar : वैजापूरमधील महिला कीर्तनकार हत्या प्रकरण, आरोपींचं CCTV फुटेज समोर

Chhatrapati Sambhajinagar : वैजापूरमधील महिला कीर्तनकार हत्या प्रकरण, आरोपींचं CCTV फुटेज समोर

| Updated on: Jun 30, 2025 | 8:05 PM
Share

Vaijapur Crime News : वैजापूरमधील महिला कीर्तनकार हत्या प्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे.

एका महिला कीर्तनकारची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरच्या  चिंचडगाव शिवारात शनिवारी सकाळी साडे सहावाजेच्या सुमारास घडली आहे. हभप संगीताताई अण्णासाहेब पवार (50, रा. चिंचडगाव) (असे घटनेतील मयत कीर्तनकार महिलेचे नाव आहे. आता या आरोपींचं एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे. मंदिराचा दरवाजा आणि सीसीटीव्ही तोंडतानाचा हा व्हिडीओ आता समोर आलेला आहे. या व्हिडीओमध्ये आरोपी स्पष्टपणे कैद झालेला आहे. चोरीच्या उद्देशाने आरोपी मंदिराचं दार तोडत असल्याचं यात उघड झालं आहे.

दरम्यान, हभप संगीताताई पवार या चिंचडगाव येथील सदगुरू नारायणगिरी महाराज कन्या आश्रम येथे वास्तव्यास होत्या. संगीताताई पवार यांच्यावर मारेकऱ्यांनी आश्रमात घुसून दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. शनिवारी सकाळी आश्रमातील मंदिरातील पुजारी शिवाजी चौधरी हे नेहमीप्रमाणे मंदिरात पूजेसाठी आले त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला होता.

Published on: Jun 30, 2025 08:05 PM