धक्कादायक! थेट घरात घुसून 25 वर्षीय महिलेचा विनयभंग अन्… नाशिकच्या सिन्ररमध्ये त्या रात्री भयंकर घडलं

धक्कादायक! थेट घरात घुसून 25 वर्षीय महिलेचा विनयभंग अन्… नाशिकच्या सिन्ररमध्ये त्या रात्री भयंकर घडलं

| Updated on: May 23, 2026 | 12:27 PM

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २५ वर्षीय महिलेवर घरात घुसून विनयभंग करण्यात आल्याची गंभीर घटना घडली असून या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित महिलेच्या पतीलाही आरोपींनी बेदम मारहाण केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी दोन आरोपी जबरदस्तीने पीडित दाम्पत्याच्या घरात घुसले. त्यांनी प्रथम पतीला मारहाण करत त्याला जखमी केले. त्यानंतर आरोपींनी महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

घटनेनंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. पीडित दाम्पत्याने तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून त्यांचा शोध सुरू आहे.

हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र अशा हल्ला आणि विकृत कृतींमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रस्न पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Published on: May 23, 2026 12:27 PM
Follow Us