चक्क नणंदेने वहिनीला सव्वा लाखाला विकलं; तिच्या पोटच्या दोन्ही मुलांना तर..
यवतमाळ जिल्ह्यातील एका विधवा महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी 1 लाख 20 हजार रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील एका विधवा महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी 1 लाख 20 हजार रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुजरातमधील एका व्यक्तीने लग्नाच्या नावाखाली तिचे दोन वर्षे शारीरिक आणि मानसिक शोषण केले. तिच्यापासून मुलगा झाल्यानंतर तिला तिच्या गावी परत आणून सोडून देण्यात आले. सध्या ही पीडित महिला आर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आपली व्यथा मांडत असून, तिच्या बेपत्ता मुलगा आणि मुलीचा शोध घेण्याची विनंती पोलिसांना करत आहे. यवतमाळच्या ग्रामीण आणि दुर्गम भागात घडलेली ही घटना समाजाला विचार करायला भाग पाडणारी आहे.
पती आणि एका मुलाच्या अकस्मात निधनानंतर ही महिला आपल्या उरलेल्या मुलगा आणि मुलीचा सांभाळ करत होती. या दुखःच्या काळात तिच्या सासरच्या मंडळींनी तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतला. तिच्या नणंद आणि नंदोई यांनी नोकरीच्या बहाण्याने तिला मध्य प्रदेशात नेले आणि तिथे तिला गुजरातमधील पोपट चौसाणी नावाच्या व्यक्तीला 1 लाख 20 हजार रुपयांना विकले. या व्यक्तीने लग्नाचे खोटे नाटक करून तिचे दोन वर्षे शोषण केले. त्यानंतर, तिच्यापासून मुलगा झाल्यावर तिला गावी परत सोडण्यात आले.
2023 मध्ये या महिलेच्या पालकांनी ती आणि तिची दोन मुले बेपत्ता असल्याची तक्रार आर्णी पोलीस ठाण्यात नोंदवली होती. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर ही महिला गावातच आढळली. तिच्याशी बोलल्यानंतर सासरच्या लोकांनी केलेल्या क्रूर कृत्याचा खुलासा झाला. पोलिसांनी तिच्या सासू, सासूच्या दुसऱ्या पती, दीर, नणंद आणि नंदोई यांच्याविरुद्ध मानवी तस्करी आणि शोषणाचे आरोप ठेवून गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

