Nala Sopara रेल्वे स्थानकात महिलेची छेडछाड; छेड काढणाऱ्या तरुणाला महिलेकडून चोप
नालासोपारा (nalasopara) स्थानकात मागून जाऊन महिलेला स्पर्श करणा-या आरोपीला 24 तास उलटायच्या आगोदर अटक केली आहे. ही घटना काल नालासोपारा रेल्वे स्थानकातल्या (railway station) प्लॅटफॉर्म क्रमांक 2 घडली होती. त्यावेळी महिला सरकत्या जिन्यावर जात असताना आरोपीने मागून स्पर्श केला.
पालघर – नालासोपारा (nalasopara) स्थानकात मागून जाऊन महिलेला स्पर्श करणा-या आरोपीला 24 तास उलटायच्या आगोदर अटक केली आहे. ही घटना काल नालासोपारा रेल्वे स्थानकातल्या (railway station) प्लॅटफॉर्म क्रमांक 2 घडली होती. त्यावेळी महिला सरकत्या जिन्यावर जात असताना आरोपीने मागून स्पर्श केला. त्यावेळी त्या महिलेने तिथं आरडाओरड केली, त्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या अनेकांना आरोपीला पकडून चोप दिला. परंतु तिथूनही आरोपी निसटून गेला. त्यानंतर पोलिसांनी (police) तो व्हिडीओ पाहिला आणि चौकशी सुरू केली. पोलिसांना गुंगारा देणा-या आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. पकडलेला आरोपी माथेफिरू असल्याचं समजतंय, तसेच तो नालासोपारा परिसरातील रहिवासी देखील आहे. आरोपीला अटक केल्यापासून नालासोपारा पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केल्याचे समजते. तसेच आत्तापर्यंत इतर कोणते गुन्हे त्याने केले आहेत का ? याची देखील चौकशी होणार आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

