BJP | भाजपला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक संसदेत नामंजूर

BJP | भाजपला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक संसदेत नामंजूर

| Updated on: Apr 17, 2026 | 9:34 PM

महिला आरक्षण अधिनियमाशी संबंधित घटना (131वे) दुरुस्ती विधेयक 2026 वर आज लोकसभेत मतदान झाले, निम्यापेक्षा जास्त मतं मिळाली तरी यात हे विधेयक पास होऊ शकले नाही.

महिला आरक्षण अधिनियमाशी संबंधित घटना (131वे) दुरुस्ती विधेयक 2026 वर आज लोकसभेत मतदान झाले, निम्यापेक्षा जास्त मतं मिळाली तरी यात हे विधेयक पास होऊ शकले नाही.

केंद्रातील NDA सरकारला मोठा धक्का बसला आहे. महिला आरक्षण अधिनियमाशी संबंधित घटना (131वे) दुरुस्ती विधेयक 2026, डिलिमिटेशन विधेयक 2026 आणि केंद्रशासित प्रदेश कायदा (दुरुस्ती) विधेयक 2026 यावर सभागृहात चर्चा झाली. यानंतर 131व्या संविधान दुरुस्तीवर चर्चेनंतर विधेयकावर मतदान घेण्यात आले.

नियमानुसार, घटना दुरुस्ती विधेयक मंजूर होण्यासाठी एकूण उपस्थित सदस्यांपैकी 2/3 बहुमत मिळणे आवश्यक असते. आज 528 सदस्यांनी मतदान केले. हे विधेयक मंजूर होण्यासाठी 352 हा बहुमताचा आकडा होता, मात्र विधेयकाच्या बाजूने 298 मते मिळाली. तर विधेयकाच्या विरोधात 230 मते मिळाली, त्यामुळे हे विधेयक लोकसभेत पास होऊ शकले नाही.

Published on: Apr 17, 2026 09:34 PM
Follow Us