Sanjay Raut on Women’s Reservation | महिला आरक्षणावर ठाकरेंची शिवसेना ठाम; मिस कॉल प्रकरणावर राऊतांचे प्रत्युत्तर
महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगताना दिसत आहे. महिला आरक्षण विधेयकावर तुमची भूमिका काय आहे? असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आला त्यावर माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, “मिस कॉल हा मिस कॉलच असतो, त्याला इतकं महत्त्व देण्याचं कारण नाही,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगताना दिसत आहे. महिला आरक्षण विधेयकावर तुमची भूमिका काय आहे? असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आला त्यावर माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, “मिस कॉल हा मिस कॉलच असतो, त्याला इतकं महत्त्व देण्याचं कारण नाही,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. प्रियंका चतुर्वेदी आणि किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या ‘मिस कॉल’ संदर्भात ते बोलत होते. महिला आरक्षण विधेयकाबाबत शिवसेनेची भूमिका सुरुवातीपासूनच स्पष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. “महिलांच्या राजकीय हिताच्या आड शिवसेना कधीच आली नाही आणि येणारही नाही,” असे राऊत म्हणाले.
तसेच, महाराष्ट्र हे महिलांच्या राजकीय आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे पहिले राज्य असल्याचा उल्लेख करत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना संधी देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. महिलांना सक्षम बनवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचाही संदर्भ दिला. “जर महिलांना संधी दिली नसती, तर मुंबईच्या महापौरपदी महिला दिसल्या नसत्या. हे एक ऐतिहासिक पाऊल आहे,” असं देखील संजय राऊत म्हणाले.
Published on: Apr 15, 2026 11:28 AM
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल

