बीडीडी चाळीतल्या रहिवाशांना राज ठाकरे यांचा आदेश; सांगितलं, तो पर्यंत…
तर बीडीडी चाळ वाशीयांच्या मुलभूत समस्या न सोडवता राहिवाशांना घर खाली करण्यास सांगण्यात येत आहे. यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत आहे. यावर तोडगा काढावा अशी मागणी राज ठाकरे यांच्याकडे करण्यात आल्याचे ते म्हणाले
मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास (BDD Chal Redevelopment Programme) करण्यात येत आहे. यासाठी काही इमारती खाली करण्यात येत आहे. पण तेथील रहिवाशांना काही गोष्टींचा खुलासा करण्यात आलेला नाही. त्यावरून आज बीडीडी चाळीतील रहिवाशांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवतीर्तालर जात भेट घेतली. यावेळी बीडीडी चाळ वाशीयांच्या विविध समस्या राज ठाकरे यांनी जाणून घेतल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी दिली. तर बीडीडी चाळ वाशीयांच्या मुलभूत समस्या न सोडवता राहिवाशांना घर खाली करण्यास सांगण्यात येत आहे. यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत आहे. यावर तोडगा काढावा अशी मागणी राज ठाकरे यांच्याकडे करण्यात आल्याचे ते म्हणाले. तर याप्रकरणी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिलं आहे. तर जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत चाळ खाली करू नये असेही ठाकरे यांनी म्हटल्याचे देशपांडे यांनी माहिती दिली.
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार

