मुंबईकरांसाठी चिंताजनक बातमी, दिवसभरात 20,181 नवे Corona रुग्ण, 4 जणांचा मृत्यू
मुंबई आज दिवसभरात वीस हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले असून कोणतीही लक्षणं नसलेल्या रुग्णांची संख्याही प्रचंड मोठी असल्याचं समोर आलं आहे. तब्बल 17154 रुग्ण असे आढळून आले आहेत, ज्यांना कोणतीही लक्षणं नाही.
मुंबई : मुंबई आज तब्बल 20 हजारपेक्षा (20 thousand plus covid cases in a single day in Mumbai) नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. 20181 नव्या रुग्णांचं निदान आज मुंबईत झालं आहे. तर 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबई आज दिवसभरात वीस हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले असून कोणतीही लक्षणं नसलेल्या रुग्णांची संख्याही प्रचंड मोठी असल्याचं समोर आलं आहे. तब्बल 17154 रुग्ण असे आढळून आले आहेत, ज्यांना कोणतीही लक्षणं नाही. अशा लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ही जास्त असल्याचंही समोर आलं आहे. दरम्यान, आज रुग्णालयात एकूण 1 हजार 170 रुग्णांचा दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Latest Videos
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
