महापालिका निवडणूक हिंदू–मुस्लिम भांडणांसाठी नाही, ठाकरेंचा विरोधकांवर थेट निशाणा
शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे विकास कामांवर बोलताना चांगलेच बरसले. महापालिका हि हिंदू -मुस्लिमांमध्ये भांडण लावण्यासाठी नसते. कोस्टल रोड ते प्रवासी सेवा बीएसटीच्या माध्यमातून देणं अशी किती तरी विकास कामे आम्ही केली आहेत महापालिका त्याच साठी असते.
टीव्ही 9 मराठीवर उद्धव ठाकरेंची नुकतीच मुलाखत प्रसिध्द झाली आहे. टीव्ही 9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी घेतलेल्या मुलाखतीत शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे विकास कामांवर बोलताना चांगलेच बरसले. महापालिका ही हिंदू -मुस्लिमांमध्ये भांडण लावण्यासाठी नसते. कोस्टल रोड ते प्रवासी सेवा बीएसटीच्या माध्यमातून देणं अशी किती तरी विकास कामे आम्ही केली आहेत. महापालिका त्याचसाठी असते, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. यावर ठाकरे असंही म्हणाले विरोधकांचं एक तरी भाषण दाखवा ज्यात त्यांनी हिंदू- मुस्लिम वाद नाही आणला. देवेंद्र फडणवीस यांच्या पासून ते नरेंद्र मोदींपर्यंत निवडणुकीचं एकतरी भाषण दाखवा जे हिंदू -मुस्लिम वादाशिवाय झालेलं आहे असं थेट आव्हान ठाकरेंनी केलं आहे. ही लढणारी लोकं नाही तर हातपाय गाळणारी माणसं आहेत अशी टीका ठाकरेंनी विरोधकांवर केली आहे.
बदलापूर सहआरोपी तुषार आपटे भाजपचा स्वीकृत नगरसेवक; संतापानंतर राजीनामा
डोळ्यात अश्रू नाही तर अंगार... उद्धव ठाकरेंची स्फोटक मुलाखत
दादा-ताई एकत्र, पुण्यात मेट्रो-बस फ्री! दादांच्या घोषणेवर BJPचा आक्षेप
ठाकरे गटाचे दगडू सकपाळ शिंदेसेनेत, निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोड

