Video : यवतमाळमध्ये कोळसा वाहून नेणाऱ्या ट्रकचाच आगीत जळून कोळसा झाला!

Yavatmal Truck Fire Video : ट्रक खदाणीजवळ पोहचताच शॉट सर्किटमुळे ट्रकच्या कॅबिन मध्ये आग भडकली.

विवेक गावंडे

| Edited By: सिद्धेश सावंत

May 21, 2022 | 12:43 PM

यवतमाळ : खाणीत कोळसा भरायला जात असलेल्या ट्रकने अचानक पेट (Yavatmal Truck fire) घेतला. बघता बघता ट्रकचं कॅबिन जळून खाक झालं. ट्रक चालकाच्या प्रसंगावनधानामुळे कोणतीही जीवितहानी (No causalities) यावेळी झाली नाही. वणी तालुक्यातील घोन्सा परिसरातील कोळसा खाणीतून कोळसा (Coal Transport) वितरीत केला जाते. खाणीतून ट्रकने कोळसा खाणीच्या बाहेर काढला जातो.तालुक्यातील घोंसा खुल्या कोळसा खाणीतून कोळसा आणण्यासाठी गंगा ट्रान्सपोर्ट कंपनी चा ट्रक क्रमांक MH 29 BD 1393 हा गेला होता. ट्रक खदाणीजवळ पोहचताच शॉट सर्किटमुळे ट्रकच्या कॅबिन मध्ये आग भडकली. आग लागल्याचं कळताच चालक ट्रक सोडून खाली उतरला. त्यामुळे त्याचा जीव थोडक्यात वाचलाय. पाहता पाहता ट्रकची राख या आगीत झाली.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें