शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!

शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!

| Updated on: Jun 07, 2026 | 2:27 PM

यवतमाळ जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड घडली. मविआमधील नेत्याने पक्षातील सर्व समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला

यवतमाळ जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड घडली. मविआमधील नेत्याने पक्षातील सर्व समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. हा पक्षप्रवेश कॉंग्रेस नेते साहेबराव कांबळे यांनी आपल्या समर्थकांसह केला आहे. हिंदुत्वाची विचारधारा, विकासाभिमुख कामे आणि लोककल्याणकारी निर्णयांमुळे प्रभावित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.

या पक्षप्रवेशात जिल्हास्तरीय अनेक ज्येष्ठ पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच तसेच खरेदी-विक्री संघाचे संचालक सहभागी झाले होते. याशिवाय शेकडो सक्रिय कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आगामी काळात जिल्ह्यात पक्षसंघटना आणखी मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या मोठ्या पक्षप्रवेशामुळे यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढल्याचे मानले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राजकीय घडामोडीकडे विशेष लक्ष लागले आहे.

Published on: Jun 07, 2026 2:27 PM
Follow Us