माथेफिरू तरुणाचा एक फोन अन् पोलिसांची धावपळ, कल्याणमध्ये नेमकं काय घडलं?
कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने पोलिसांना फोन करून दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. अखेर पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे.
कल्याण : कल्याणमधून (kalyan) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने पोलिसांना (Police) फोन करून बाजारपेठेत असलेल्या कचराकुंडीत बॉम्ब असल्याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र त्यांना तिथे कुठेही बॉम्ब आढळून आला नाही. अखेर पोलिसांनी या तरुणाचा कॉल ट्रेस करून त्याला अटक केली. बॉम्बची माहिती मिळाल्यावर पोलीस काय करतात? हे पहाण्यासाठी या तरुणाने पोलिसांना फेक कॉल केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या प्रकारामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. या कॉलमुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. अखेर पोलिसांनी या तरुणाचा शोध घेऊन त्याला अटक केली.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?

