AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना फसवलं”

राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी (NCP MLA on Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना फसवून राजभवनात नेल्याचा आरोप होत आहे.

अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना फसवलं
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Nov 23, 2019 | 2:54 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी (NCP MLA on Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना फसवून राजभवनात नेल्याचा आरोप होत आहे. अजित पवार यांच्या शपथविधीला राजभवनात उपस्थित असलेल्या आमदारांपैकी काही आमदारांनी (NCP MLA on Ajit Pawar) याबद्दल आपली भावना व्यक्त केली आहे. यात आमदार राजेंद्र शिंगणे आणि सुनिल भुसारा यांचा समावेश आहे. संबंधित आमदारांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचंही स्पष्ट केलं. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देखील काही आमदारांना फसवून तेथे नेले होते, असे आरोप केला आहे.

आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले, “रात्री 12 वाजता अजित पवार यांचा फोन आला. सकाळी 7 वाजता त्यांनी बंगल्यावर महत्त्वाच्या विषयावर काही चर्चा करण्यासाठी बोलावले. तसेच सकाळी 8 वाजता त्यांना बबनदादा यांच्या कारखान्यावर जायचं आहे, असंही सांगितलं. त्याप्रमाणे मी सकाळी 7 वाजता बी4 या बंगल्यावर पोहचलो. माझ्याआधी तेथे 2-3 आमदार आलेले होते. 15 मिनिटात तेथे 9-10 आमदार आले. आम्ही पावणेआठ पर्यंत तेथे बसलो. 7.45 वाजता मुंबईत कुठेतरी एका ठिकाणी बसायचं आहे, असा निरोप आला. तेथे सर्वांना एकत्र येण्यास सांगितलं. म्हणून आम्ही सर्व 10 जण तेथे जाण्यासाठी निघालो. मात्र, 15 मिनिटातच जेव्हा राजभवनावर पोहचलो. त्यावेळी आम्ही सर्वजण अस्वस्थ झालो.”

आम्ही कोठे चाललो, कोणत्या कामासाठी चाललो याची काहीही कल्पना नव्हती. त्यानंतर आम्हाला राजभवनातील एका हॉलवर बसवण्यात आलं. 5 मिनिटातच देवेंद्र फडणवीस तेथे आले. चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन देखील तेथे आले. त्यानंतर 5 मिनिटात राज्यपालही तेथे आले. त्यांनी ताबडतोब शपथविधीचा कार्यक्रम घेतला. आम्हाला या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती. आम्ही एकूण राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आमदार होतो. त्यात धनंजय मुंडे नव्हते. बंगल्यावर गेलो तेव्हा देखील धनंजय मुंडे नव्हते. आम्ही बंगल्यावर त्यांची चौकशी केली नाही. आम्ही बाहेरच बसलो होतो, असंही शिंगणे यांनी नमूद केलं.

“आम्ही प्रचंड संभ्रमावस्थेत होतो. शपथविधी झाल्यानंतर आम्ही तात्काळ बाहेर पडलो”

आमदार सुनिल भुसारा म्हणाले, “शिंगणे सरांनी सांगितलं त्याप्रमाणेच घडलं. आम्ही नेहमीच अजित पवारांना सकाळीसकाळी भेटतो. त्याप्रमाणेच आम्ही गेलो होतो. त्यानंतर आम्ही धनंजय मुंडे यांना देखील भेटणार होतो. सकाळी 7.30 वाजता अजित पवार यांना, तर 8.30 वाजता शरद पवार यांना भेटणार होतो. त्यामुळे सर्वच जण भेटणार असतील असं समजून आम्ही अजित पवारांना भेटायला गेलो. मात्र राजभवनात गेलो तर तेथे शपथविधीची तयारी दिसली. त्यानंतर आम्ही तेथून बाहेर पडलो. आम्हाला आधी काहीही माहिती नव्हती. आम्ही प्रचंड संभ्रमावस्थेत होतो. शपथविधी झाल्यानंतर आम्ही तात्काळ बाहेर पडलो आणि शरद पवार यांची भेट घेतली.”

Follow Us
रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
Rohit Pawar : NCP : रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले CCTV....
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; नागपूरच्या रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले 20 हून अधिक CCTV कॅमेरे हटवले
व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा..
WhatsApp Web : व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा काय?
घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..; दरेकरांचा रोहित....
Pravin Darekar on Rohit Pawar : घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..;  दरेकरांचा रोहित पवारांना खोचक टोला
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?