AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी राज ठाकरेंना निमंत्रण

स्वतः उद्धव ठाकरे राज ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देणार असल्याची माहिती आहे.

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी राज ठाकरेंना निमंत्रण
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Nov 27, 2019 | 1:33 PM
Share

मुंबई : ठाकरे कुटुंबातील आनंदाच्या क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असताना राज ठाकरे हजर राहण्याची चिन्हं आहेत. स्वतः उद्धव ठाकरे यांनी राज यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी फोन करुन निमंत्रण (Uddhav Thackeray Sworn in Ceremony) दिल्याची माहिती ‘टीव्ही9 मराठी’च्या सूत्रांनी दिली आहे.

शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचा शब्द उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिला होता. ही वचनपूर्ती खुद्द उद्धव ठाकरे यांच्या रुपाने होणार आहे. कारण थेट शिवसेना पक्षप्रमुखच मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार आहेत. सोबतच आदित्य ठाकरे यांचीही विधीमंडळात एन्ट्री झालेली आहे. ठाकरे कुटुंबातून आतापर्यंत कोणीही निवडणूक लढवली नव्हती. पण आता आदित्य ठाकरेंना आमदारकी आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद असा दुहेरी आनंदाचा क्षण ठाकरे कुटुंबासाठी आहे. त्यामुळे या क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीची तारीख बदलली

उद्धव ठाकरे उद्या (गुरुवार 28 नोव्हेंबर) संध्याकाळी पाच वाजता शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राज ठाकरे शिवाजी पार्क परिसरातच ‘कृष्णकुंज’मध्ये राहतात. त्यामुळे शपथविधीला ते पत्नी, मुलगा, सून, मुलगी आणि मातोश्री यांच्यासह उपस्थित राहतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. याआधीही ठाकरे कुटुंबाच्या आनंदाच्या किंवा दुःखाच्या क्षणात राज यांनी साथ दिली आहे. फारकत घेतल्यानंतर बाळासाहेबांचं निधन असो, किंवा उद्धव ठाकरे यांचं आजारपण, राज ठाकरे स्वतः हजर राहिले होते. तर राज यांचे पुत्र अमित ठाकरेंच्या लग्नालाही उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब हजेरी लावली होती. त्यामुळे दादाला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना ‘याचि देहि याचि डोळा’ पाहण्यासाठी राज ठाकरे उपस्थित राहू शकतात.

आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तिथे मनसेने विरोधात उमेदवार उभा केला नव्हता. ‘हे एक चांगलं कृत्य (गुडविल जेश्चर) आहे. तो निवडणूक लढवत असेल, तर त्याच्याविरोधात उमेदवार देता कामा नये, असं मला वाटतं, त्यांना काय वाटतं, हा वेगळा मुद्दा आहे, असंही राज ठाकरे निवडणुकीपूर्वी म्हणाले होते.

जर आमच्या मुलांना निवडणूक लढवावी असं वाटत असेल, तर आम्ही त्यांना मागे खेचणार नाही. त्यामुळे आदित्यला निवडणूक लढवायची असेल, तर त्यात चूक काय? असंही राज ठाकरे (Uddhav Thackeray Sworn in Ceremony) म्हणाले होते

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली