उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीची तारीख बदलली

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांनी उद्धव ठाकरे येत्या गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असे (uddhav thackeray oath taking ceremony at thursday) सांगितले. 

उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीची तारीख बदलली
Follow us
| Updated on: Nov 26, 2019 | 11:21 PM

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अवघ्या 4 दिवसात कोसळल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं महाविकासआघाडीचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं (uddhav thackeray oath taking ceremony at thursday) आहे. या पार्श्वभूमीवर आज (26 नोव्हेंबर) महाविकासआघाडीचे नेत्यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला. यावेळी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांनी उद्धव ठाकरे येत्या गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील असे (uddhav thackeray oath taking ceremony at thursday) सांगितले.

अबू आझमी यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधी होईल. शिवाजी पार्कवर मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी पार पडणार आहे. यासाठी महापालिकेला तयारीचे आदेश देण्यात आले  (uddhav thackeray oath taking ceremony at thursday) आहेत.

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद ट्रायडेंट हॉटेलला पार पडली. यावेळी तिन्ही पक्षांच्या आघाडीला महाराष्ट्र विकास आघाडी म्हणून नाव देण्यात आले.  या महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली. याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे विराजमान होणार आहेत.

“आम्ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच मित्रपक्षांनी एकत्र सरकार स्थापनेचे विनंती करण्याचे पत्र राज्यपालांना दिले. आमच्याकडे बहुमत असलं तरीही बहुमताची चाचणी द्यावे लागेल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब ठाकरे म्हणाले. दरम्यान अद्याप मंत्री म्हणून कोण शपथ घेईल याबाबत चर्चा झालेली नाही. तसेच माझ्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत माहिती नाही,” असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी महाविकासआघाडीच्या नेतेपदी आणि राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असावे असा ठराव मांडला. या  ठरावाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या सर्व आमदारांनी एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना नावाला एकमताने मंजूरी देण्यात आली. यामुळे आता महाराष्ट्रात ठाकरे सरकार असणार (uddhav thackeray oath taking ceremony at thursday) आहे.

मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरेच!

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी महाविकासआघाडीच्या नेतेपदी आणि राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असावे असा ठराव मांडला. या  ठरावाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या सर्व आमदारांनी एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना नावाला एकमताने मंजूरी देण्यात आली. यामुळे आता महाराष्ट्रात ठाकरे सरकार असणार आहे.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.