शेतकऱ्यांची बाजारात जाड कापड खरेदीला गर्दी, गरजेची वस्तू असल्यामुळे…

नांदेडमध्ये मागच्या दोन दिवसांपासून चांगला पाऊस सुरु आहे. पावसापासून पिकाचं रक्षण करण्यासाठी कापडाची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची बाजारात अधिक गर्दी दिसत आहे. शिवारात काम करीत असताना पावसात खत, बियाणे भिजू नये यासाठी कापडाचा वापर केला जातो.

शेतकऱ्यांची बाजारात जाड कापड खरेदीला गर्दी, गरजेची वस्तू असल्यामुळे...
farmer news
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 29, 2023 | 1:32 PM

नांदेड : मृग नक्षत्राच्या सुरुवातीला होणारा पाऊस नांदेडमध्ये (Nanded rain update) साधारण वीस दिवस उशिराने दाखल झाला आहे. त्यामुळे उडीद मुगाच्या पेरणी क्षेत्रात यंदाही घट जाणवत आहे. नांदेडमध्ये काही ठिकाणी उडीद आणि मुगाची पेरणी शेतकरी करीत आहेत. साधारणपणे 25 वर्षांपूर्वी उडीद आणि मुगाची नांदेडमध्ये 90 टक्के क्षेत्रावर पेरणी होत असे आता हा आकडा अवघ्या दहा ते पंधरा टक्क्यांवर आला आहे. त्यातून उडीद आणि मुंगाच्या पिकाला कायमच चढा भाव मिळताना दिसतोय. महाराष्ट्रात (maharashtra) अनेक ठिकाणी पेरणीला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी पुढचे काही दिवस मुसळधार पाऊस (heavy rain in nanded) राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

नांदेडमध्ये मागच्या दोन दिवसांपासून चांगला पाऊस सुरु आहे. पावसापासून पिकाचं रक्षण करण्यासाठी कापडाची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची बाजारात अधिक गर्दी दिसत आहे. शिवारात काम करीत असताना पावसात खत, बियाणे भिजू नये यासाठी कापडाचा वापर केला जातो. प्लास्टिकच्या कागदावर बंदी असल्यामुळे जाड असलेले कागद खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. सध्या शेतकऱ्यांसाठी ती वस्तू गरजेची असल्यामुळे खरेदीसाठी दुकानात अधिक गर्दी केली जात आहे.

नांदेड जिल्ह्यात पहिल्याच महापालिकेचं पितळ उघडं पडलं आहे. नालेसफाई नीट न झाल्यामुळे नांदेड शहरातील अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचलय. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत असताना गाडी चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. जागोजागी रस्त्याचे काम सुरू असून खड्ड्यात पडून जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जातं आहे. या प्रकारामुळे नांदेडकर पालिकेच्या विरोधात संताप व्यक्त करीत आहेत.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे एक घर पडलं…

गोंदिया जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान मांडले असून पावसामुळे जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली आहे. या अतिवृष्टीमुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भरनोली गावातील एक घर पावसामुळे पडले आहे. या कुटुंबाला राहण्यासाठी जागा नसल्याने या कुटुंबियाने गावातील समाजभवनाचा आसरा घ्यावा लागला. भर पावसाळ्यात घर पडले असल्यामुळे आता कुठे राहावं असा बिकट प्रसंग कुटुंबासमोर उभा राहिलेला आहे. तरी शासनाने लवकरात लवकर मदत करावी अशी कुटुंबाने व गावकऱ्यांनी मागणी केली आहे.