Ajit Pawar Death in Plane Crash : हुंदके, भिजलेले डोळे आणि सुन्न शांतता… उद्धव ठाकरे बारामतीत, रश्मी ठाकरेंनी केलं सुनेत्रा पवारांचं सांत्वन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या भीषण दुर्घटनेत त्यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्राला या घटनेने मोठा धक्का बसला असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. आज बारामती येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. काल रात्र उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार व त्यांची मुलं यांची सांत्वनपर भेट घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा काल (बुधवार 28 जानेवारी) बारमतीजवळ विमान अपघातात मृत्यू झाला. चार सभांसाठी मुंबईहून बारामतील निघालेल्या या विमानात अजित पवारांसह आणखी 4 जणांचा समावेश होता. सकाळी 8 च्या सुमारास मुंबईहून या विमानाने उड्डाण केलं आणि 8.45 च्या सुमारासा ते बारामतीतील रनवेजवळील एका शेतात धाडकन कोसळलं. खाली पडताच विमानाने पेट घेतला आणि 3-4 मोठे स्फोट झाले, आग लागील. यामुळे कोणीही वाचण्याची शक्यता उरली नाही. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह त्यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक विदीप जाधव, विमानाचे पायलट कॅप्टन सुमित कपूर, को-पायलवट शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माली या पाचही जणांचा मृत्यू झाला.
अजित दादांच्या निधनाची बातमी समोर येताच अख्खा महाराष्ट्र हादरला. संपूर्ण पवार कुटुंब, बारामतीकर एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागिरक दादांच्या जाण्यामुळे शोकाकुल झाले. बारामतीमधील वैद्यकीय महाविद्यालयात दादांचा मृतदेह ठेवण्यात आला. संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीत असलेल्या अजित पवारांची बहीण आणि पत्नी, खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांन तातडीने बारामतीच्या दिशेने प्रयाण केले. तर शरद पवार हेही मुंबईहून बारामतीच्या दिशेने निघाले. दिवसभर बारामतीत लोकांचा ओघ सुरू होता. मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी बारामती येथे जाऊन अजित पवारांचे अंत्यदर्शन घेतले. पवार कुटुंबियांची भेट त्यांचे सांत्वन केलं. तर राज ठाकरे, संजय राऊत यांच्यासह अनेकांनी दादांच्या जाण्याबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
उद्धव व रश्मी ठाकरे बारामतीत, सुनेत्रा पवारांचं केलं सांत्वन
दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही काल रात्री बारामतीमध्ये पोहोचले. त्यांच्यासह पत्नी रश्मी ठाकरे व मुलगा आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. बारामतीमधील निवासस्थानी जाऊन उद्धव यांनी दादांचं अंतिम दर्शन घेतलं. सुनेत्रा पवार व दादांच्या कुटुंबियांची भेट घेऊन उद्धव , रश्मी व आदित्य ठाकरे यांनी त्यांचं सांत्वन केलं. यावेळी वातावरण अगदी सुन्न होतं, पवार कुटुंबियांचे भरलेले डोळे, हुंदके पाहून सर्वच गहिवरले. सुनेत्रा पवारांचं ांत्वन करताना रश्मी ठाकरेही गहिवरल्या.
अजित पवारांना आज अखेरचा निरोप
अजित पवार यांना आज बारामतीमध्ये अखेरचा निरोप दिला जाणार आहे. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आज सकाळी 11 वाजता अजित पवारांवर अंत्यसंस्कार होणारयावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. तत्पूर्वी सकाळी काही काळ काटेवाडी येथे अजित पवारांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान अजित पवार यांचा मृत्यू घातापात नसून तो केवळ अपघात आहे, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि अजित पवार यांचे काका शरद पवार यांनी काल स्पष्ट केलं. त्यांच्या मृत्यूचं राजकारण करू नका, त्यांचं जाणं हे राज्याची आणि आमचीही मोठी हानि आहे, असं सांगताना शरद पवार यांना अश्रू अनावर झाले होते.
