AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाकाहारी थाळीची किंमत जुलै महिन्यात २८ टक्के वाढली, ही कारण ठरली महत्त्वाची

जूनच्या तुलनेत जुलैच्या शाकाहारी थाळीत बदल झाला. याचा परिणाम सामान्यांच्या खिशावर झाला आहे. परंतु, मांसाहारी थाळीच्या किमतीत फक्त १३ टक्के वाढ दिसून आली.

शाकाहारी थाळीची किंमत जुलै महिन्यात २८ टक्के वाढली, ही कारण ठरली महत्त्वाची
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Aug 08, 2023 | 7:05 PM
Share

नवी दिल्ली : थाळीमध्ये जुलै महिन्यात वाढ झाल्याचे दिसून येते. भारतात शाकाहारी थाळीची किंमत जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात २८ टक्के जास्त झाली. ही वाढ २५ टक्के फक्त टोमॅटोमुळे झाली. जूनमध्ये टोमॅटोचे भाव ३३ रुपये किलोवरून ११० रुपये किलोपर्यंत गेले. क्रिसील यांनी एक अहवाल तयार केला. त्यानुसार हे रेट वाढले आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये थालीच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून आले. शाकाहारी थाळीच्या तुलनेत मासाहारी थाळीची किंमत १३ टक्के महागली आहे.

सामान्यांच्या खिशाला कात्री

क्रिसिल उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भारतातील साधारण थाळीच्या रेटला कॅल्कुलेट करतात. जूनच्या तुलनेत जुलैच्या शाकाहारी थाळीत बदल झाला. याचा परिणाम सामान्यांच्या खिशावर झाला आहे. परंतु, मांसाहारी थाळीच्या किमतीत फक्त १३ टक्के वाढ दिसून आली. टोमॅटो आणि दुसऱ्या भाजीपाल्याशिवाय धान्य, डाळी, मसाले, खाद्य तेल आणि गॅसच्या किमतीतही वाढ झाली. या सर्व बाबींचा परिणाम शाकाहारी थाळीच्या किमतीवर झाला आहे.

बटाटा, कांद्याच्या किमतीत वाढ

शाकाहारी थाळीमध्ये पोळी, कांदे, टोमॅटो, बटाटे, भात, डाळ, दही आणि सलाद असतो. कांदा आणि बटाटे यांच्या किमतीत क्रमशा १६ आणि ९ टक्के वाढ झाली आहे. याचा परिणाम शाकाहारी थाळीवर झाला आहे.

हिरवी मिरची आणि जीऱ्याच्या किमतीत वाढ

क्रिसिल यांच्या रिपोर्टनुसार, मिरची आणि जीऱ्याच्या किमतीत वाढ झाली आहे. जुलैमध्ये याच्या किमतीत ६९ टक्के आणि १६ टक्के टक्के वाढ झाली. याचाही परिणाम शाकाहारी थाळीच्या किमतीत वाढीवर झाला आहे. असेच सुरू राहिल्यास शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार आहेत. शेतीकडे वळण्याचे प्रमाण वाढणार आहे. क्रिसिल यांनी सांगितले की, थाळीमध्ये साहित्याचा कमी वापर होताना दिसून येत आहे. वनस्पती तेलाच्या महिन्यात दोन टक्के घट झाली.

Follow Us