Watermelon : हंगामी पिकांनीही शेतकऱ्यांची साथ सोडली, खर्च वाढला अन् कवडीमोल दर मिळाला

| Updated on: May 10, 2022 | 10:20 AM

3 वर्षापूर्वी महाराष्ट्रातून उत्तरेकडील तसेच पश्चिमेकडील राज्यात महाराष्ट्रातून कलिंगडची निर्यात होत असे. त्यामुळे संपूर्ण हंगाम कलिंगडचे दर टिकून राहत होते शिवाय यामध्ये वाढ होत होती. आता मात्र, उत्तर भारतामध्येही कलिंगडचे उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरच कलिंगड मिळत असल्याने व्यापारी आता राज्यात फरकतही नाहीत अशी अवस्था आहे. मध्यंतरी सण आणि रमजानच्या महिन्यामुळे कलिंगडसह इतर पिकांनाही मागणी होती पण आता चित्र बदलले आहे.

Watermelon : हंगामी पिकांनीही शेतकऱ्यांची साथ सोडली, खर्च वाढला अन् कवडीमोल दर मिळाला
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

अकोला : खरीप-रब्बी हंगामातील (Main Crop) मुख्य पिकांवर निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम तर झालाच होता पण पोषक वातावरण आणि मुबलक पाणीसाठा यामुळे हंगामी पिकातून भरपाई काढता येईल म्हणून शेतकऱ्यांनी खरबूज, (Watermelon) कलिंगड यासारख्या हंगामी पिकांची लागवड केली. वातावरणातील बदलाचे संकट टळले असले तरी बाजारपेठेतील (Watermelon Rate) दराचे चढ-उतार शेतकऱ्यांच्या मुळावर आले आहेत. रमजान महिना संपल्यापासून तर कलिंगड कवडीमोलातच विकले जात आहे. शिवाय खरेदीसाठी व्यापारी फिरकत नसल्याने शेतकऱ्यांनाच किरकोळ व्यापारी म्हणून गल्ली-बोळात जाऊन कलिंगडची विक्री करावी लागत आहे. हंगामाच्या सुरवातीला 14 ते 15 रुपये किलो असलेले कलिंगड आता 3 ते 4 रुपये किलो झाले आहे. त्यामुळे गेली दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव अन् यंदा दरातील लहरीपणा याचा फटका शेतकऱ्यांनाच सहन करावा लागणार आहे.

कलिंगड निर्यात घटली, उत्पादनात वाढ झाली

3 वर्षापूर्वी महाराष्ट्रातून उत्तरेकडील तसेच पश्चिमेकडील राज्यात महाराष्ट्रातून कलिंगडची निर्यात होत असे. त्यामुळे संपूर्ण हंगाम कलिंगडचे दर टिकून राहत होते शिवाय यामध्ये वाढ होत होती. आता मात्र, उत्तर भारतामध्येही कलिंगडचे उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरच कलिंगड मिळत असल्याने व्यापारी आता राज्यात फरकतही नाहीत अशी अवस्था आहे. मध्यंतरी सण आणि रमजानच्या महिन्यामुळे कलिंगडसह इतर पिकांनाही मागणी होती पण आता चित्र बदलले आहे. वाढत्या उन्हामध्येही दर वाढची कोणतेच संकेत दिले गेलेले नाही.त्यामुळे कलिंगड उत्पादक अडचणीत आहेत.

व्यापाऱ्यांनीही फिरवली पाठ

हंगामाच्या सुरवातीला व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावरुन कलिंगडचा दर्जा पाहून खरेदी करीत होता. मात्र, आता परस्थिती बदललेली आहे. उत्पादनात वाढ झाली असून दर निम्म्याने घटलेले आहेत. शिवाय दुसरीकडे डिझेलचे दर वाढले असल्याने वाहतूक खर्चही व्यापाऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे काही दिवस गेल्यानंतर सर्वकाही सुरळीत झाल्यावरच शेतीलाचे दर वाढतील असा अंदाज आहे. सध्याची परस्थिती शेतकऱ्यांच्या नुकासनीची आहे. काही

हे सुद्धा वाचा

वातावरण बदलाचा परिणाम नेमका काय?

कमी दिवसांमध्ये अधिकचे पीक पदरी पडते त्यामुळे हंगामी पिकांमध्ये टरबूजाला पसंती दिली जात आहे. गतवर्षी बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तेच भरुन काढण्यासाठी यंदा अधिकच्या क्षेत्रावर कलिंगड लागवड करण्यात आली होती. मात्र, आवक एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली आहे की व्यापारीही कलिंगड घेण्यास धजावत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना विक्रेत्याची भूमिका बजवावी लागत आहे. ठोक बाजारपेठेत केवळ 4 ते 5 रुपये किलो असा दर कलिंगडला मिळत आहे. त्यामुळे मुख्य पिकांमधून तर नुकसान झालेच पण हंगामी पिकांनीही साथ सोडल्याची शेतकऱ्यांची भावना झाली आहे.