अवकाळी- अतिवृष्टीनंतर आता नवीनच संकट, फळबागांना कशाचा धोका ? वाचा सविस्तर

| Updated on: Feb 12, 2022 | 11:22 AM

निसर्गाचा लहरीपणा फळबागांसाठी कायम एक दुष्टचक्र म्हणूनच राहिला आहे. यंदा तर त्याची दाहकता अधिक जाणवली आहे. आतापर्यंत अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे आंबा आणि काजू बागांना फटका बसलेला होता. मात्र, वातावरण निवाळल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला घेऊन आशा पल्लवीत होत असतानाच कोकणात पुन्हा वादळी वारे आणि थंडीत वाढ होत आहे.

अवकाळी- अतिवृष्टीनंतर आता नवीनच संकट, फळबागांना कशाचा धोका ? वाचा सविस्तर
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

सिंधुदुर्ग : निसर्गाचा लहरीपणा (Orchard) फळबागांसाठी कायम एक दुष्टचक्र म्हणूनच राहिला आहे. यंदा तर त्याची दाहकता अधिक जाणवली आहे. आतापर्यंत अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे (Mangoes and Cashewnuts) आंबा आणि काजू बागांना फटका बसलेला होता. मात्र, वातावरण निवाळल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला घेऊन आशा पल्लवीत होत असतानाच कोकणात पुन्हा (Stormy Winds) वादळी वारे आणि थंडीत वाढ होत आहे. त्यामुळे तिसऱ्या हंगामातील आंब्याच्या मोहरला पुन्हा धोका निर्माण झाला आहे. तर काजू बागांचेही नुकसान होत आहे. सह्याद्री पट्ट्यातील गावांमध्ये अधिक जोराचे वारे वाहू लागल्याने फळबागांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये वातावरणात बदल झाला असून पहाटेच सोसाट्याचा वारा सुटत आहे.

आंबा, काजूच्या फळबागांना नेमका धोका काय?

गेल्या 8 दिवसापासून वातावरण निवळल्याने आंब्याला मोहर लगडला होता तर काजूच्या बागांचेही योग्य नियोजन शेतकऱ्यांनी केले होते. त्यामुळे उत्पादनात वाढ होईल असा अंदाज व्यक्त होत असताना वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग होणार असेच चित्र आहे. वाऱ्याच्या वेगाने आंबा आणि काजूची झाडे ही पिवळी पडत आहेत. तर मोहरही गळून पडत आहे. काजूचे बी गळण्याचा अधिक धोका असल्याने आता हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिसकावला जाणार अशी स्थिती कोकणातील फळ बागायत शेतकऱ्यांवर आली आहे.

ऐन बहरात असतानाच काजूचे नुकसान

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पट्ट्यातील करुळ, कुंभवडे, भुईबावडा, येणारी या भागात गेल्या दोन दिवसांपासून वेगाने वारा वाहत आहे. शिवाय याच गावच्या शिवारात काजू लागवड आहे. सध्या काजू हे पीक बहरले असून मोहर आणि बारीक काजूही झाडावर दिसून येत आहे. त्यामुळे या वाऱ्याने काजूच सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या वाऱ्यामुळे अनेक बागा उध्वस्त झाल्या होत्या. आता पुन्हा तेच संकट फळबागायत शेतकऱ्यांवर ओढावत आहे.

अवकाळी, अतिवृष्टीनंतर आता वारा

फळबागांवर एका मागून एक संकटाची मालिका ही सुरुच आहे. हंगामाच्या सुरवातीला अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे कीड-रोगराईचा प्रादुर्भाव वाढला. यावर औषध फवारणी करुन शेतकऱ्यांनी नियंत्रण मिळवले पण नंतरच्या अतिवृष्टीने बागाच उध्वस्त झाल्या होत्या. आता कुठे वातावरण निरभ्र झाले होते. त्यात पुन्हा दोन दिवसांपासून वाऱ्याचा वेग वाढला असल्याने फळबागायतदार शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

संबंधित बातम्या :

काय सांगता? शास्त्रीय संगीत ऐकूण गायीच्या दूध उत्पादनात वाढ, तरुण शेतकऱ्याचा अनोखा अंदाज

Photo: ऐकावे ते नवलच: महावितरणचे कर्मचारी समोर असताना शॉर्टसर्किटने ऊसाच्या फडाला आग

Banana Rate: सर्वकाही नियोजनाप्रमाणे, वातावरण निवळले, केळीची आवक सुधारली अन्…