AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Onion Price: कांद्याचे भाव वाढण्याचं कारण काय? महाराष्ट्रातील कांदा बाजारपेठांची स्थिती काय?

ऑनलाईन मार्केट म्हणजेच ई-नाम नुसार राज्यातील लोणंदमध्ये 1 मार्चला कांद्याचा दर 3600 रुपये क्विंटल होता. (Onion rates)

Onion Price: कांद्याचे भाव वाढण्याचं कारण काय? महाराष्ट्रातील कांदा बाजारपेठांची स्थिती काय?
कांदा
| Updated on: Mar 02, 2021 | 6:33 PM
Share

मुंबई: देशातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ समजली जाणाऱ्या नाशिकच्या लासलगाव बाजारपेठेत कांद्याचा दर 1 ते 2 हजार 800 रुपयांदरम्यान राहिला. कांद्याचे दर सातत्यानं वाढत आहेत. गतवर्षी या काळात कांद्याचा दर 1450 रुपये क्विंटलच्या दरम्यान होता. सध्या उन्हाळी कांदा बाजार समित्यांमध्ये येत आहे. तरी देखील कांद्याचे दर कमी होत नसल्याचे चित्र आहे. किरकोळ बाजारात कांदा 50 रुपये किलोनं विकला जातोय. (Agriculture News why onion rates increasing Maharashtra market rates )

महाराष्ट्राच्या कांदा बाजारपेठांमधील दर

ऑनलाईन मार्केट म्हणजेच ई-नाम नुसार राज्यातील लोणंदमध्ये 1 मार्चला कांद्याचा दर 3600 रुपये क्विंटल होता. तर पंढरपूरमध्ये कांद्याचा दर 3200 रुपये इतका होता. तर दोन्ही बाजारपेठांमध्ये कांद्याचा कमाल दर 4 हजार रुपये क्विंटल राहिला. महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक भारत दिघोळे यांनी गेल्या वर्षाच्या तलनेत कांद्याची आवक निम्मी असल्याचं सांगितलं. त्यामुळे कांद्याचे दर वाढल्याचे ते म्हणाले.

शेतकऱ्यांचं नुकसान होईल

भारत दिघोळे यांनी सांगितल्यानुसार महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं अवकाळी पावसानं मोठं नुकसान झाले आहे. एका एकरामध्ये 120 क्विंटल कांद्याचं उत्पादन होतं त्यापैकी 45 क्विंटल कांदा खराब झाला. तो कांदा शेतामध्येच फेकून द्यावा लागला. एवढं संकट सोसून शेतकऱ्यांनी कांदा बाजारपेठेत आणला आहे. त्याला कमी दर मिळाला तर त्यांचं नुकसान होईल. त्यामुळे सध्या मिळत असलेल्या भाव कायम राहावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.

कांद्याच्या लागवडीला खर्च किती?

राष्ट्रीय हॉर्टिकल्चर बोर्डाच्या 2017 च्या अहवालानुसार शेतकऱ्यांना एक किलो कांदा उत्पादित करण्यासाठी 9.34 रुपयांचा खर्च येतो. भारत दिघोळे यांनी सांगितल्यानुसार लाल कांद्याला 24 ते 30 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो. रब्बी हंगामामध्ये सरासरी 18 ते व24 रुपये दर मिळतोय. दर अवकाळी पावसामुळे कांद्याचं नुकसान झालं नसतं तर कांद्याचा भाव 8 ते 14 रुपयांदरम्यान राहतो. सध्या कांद्याला चांगला दर मिळतोय मात्र नाशिक, पुणे,धुळे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालयं. जानेवारी महिन्यातील 7 ते 10 तारखेदरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.

संबंधित बातम्या:

अवकाळीचा फटका कांद्याच्या बाजार भाववाढीचा सर्वसामान्यांना झटका

Onion Price Today : कांदा सर्वसामान्यांना रडवणार, लासलगावात कांदा 45 रुपयांवर पोहोचला

(Agriculture News why onion rates increasing Maharashtra market rates)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.