Vedic Paint | गायीच्या शेणापासून वैदिक रंगाची निर्मिती, वैशिष्ट्यं काय?

यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचे उत्पन्न मिळेल, असा सरकारचा उद्देश आहे. (Central Government to Launch Cow Dung-based Vedic Paint)

Vedic Paint | गायीच्या शेणापासून वैदिक रंगाची निर्मिती, वैशिष्ट्यं काय?
वैदिक पेंट
Follow us
| Updated on: Jan 12, 2021 | 10:35 AM

नवी दिल्ली : ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकार आज (11 जानेवारी) गाईच्या शेणापासून बनवण्यात येणारा वैदिक रंग लाँच करणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचे उत्पन्न मिळेल, असा सरकारचा उद्देश आहे. (Central Government to Launch Cow Dung-based Vedic Paint)

Khadi and Village Industries Commission तर्फे हा रंग लाँच केला जात आहे. केंद्र सरकारकडून लाँच करण्यात येणार हा रंग डिस्टेंपर आणि इमल्शन यामध्ये उपलब्ध होणार आहे. हा रंग इको फ्रेंडली, नॉन टॉक्सिक, अँटी बॅक्टिरिअल, अँटी फंगल आणि वॉशेबल असेल. विशेष म्हणजे हा रंग वाळण्यासाठी फक्त चार तास लागतात. यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी 55 हजारांचे अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे.

भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना जास्तीचे उत्पन्न मिळावे यासाठी Khadi and Village Industries Commission च्या माध्यमातून हा नवा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला गायीच्या शेणापासून बनवण्यात आलेला वैदिक रंग वापरता येणार आहे.

या रंगाचे वैशिष्ट्यं म्हणजे हा रंग इको फ्रेंडली, नॉन टॉक्सिक, अँटी बॅक्टिरिअल, अँटी फंगल आणि वॉशेबल आहे. हा रंग नैसर्गिक रंगद्रव्ये आणि मिश्रण मिळून तयार करता येणार आहे. यात आवश्यकेनुसार वेगवेगळे रंग मिसळता येऊ शकतात.

सध्या हा रंग 2 लीटरपासून 30 लीटरपर्यंत डब्ब्यात पॅकिंग करण्यात आला आहे. गायीच्या शेणापासून बनवण्यात आलेला हा रंग म्हणजे एक क्रांतिकारी पाऊल असल्याचे बोललं जात आहे. यामुळे गोशाळांचे उत्पन्न वाढेल. त्यासोबतच कोरोना काळात एक नवा उद्योगही तयार होईल. (Central Government to Launch Cow Dung-based Vedic Paint)

संबंधित बातम्या :  

सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट्स, पाहा गुड मॉर्निंग महाराष्ट्र, दररोज सकाळी 7 वा. @TV9Marathi वर 

कोण म्हणतो पुरूषच जास्त पेताड, आता महिलाही डबल टल्ली! वाचा सविस्तर

Corona cess | आधीच कोविडनं कंबरडं मोडलं, त्यात आता कोविडचा सेस लावणार सरकार?

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.