वातावरणातील बदलाने द्राक्ष बागांवर रोगराईचे अतिक्रमण, कृषितज्ञांचा बागायत शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला

| Updated on: Nov 24, 2021 | 12:38 PM

निसर्गाच्या लहरीपणा आता फळबागायत शेतकऱ्यांवर बेतत आहे. आतापर्यंत खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतरही पावसामध्ये सातत्य असल्याने रब्बीच्या पेरण्या ह्या रखडलेल्या होत्या तर आता द्राक्ष बागा अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पाऊस आणि सकाळच्या प्रहरातील धुके यामुळे द्राक्षांची गळ वाढलेली आहे तर डावणी, करपा या रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे.

वातावरणातील बदलाने द्राक्ष बागांवर रोगराईचे अतिक्रमण, कृषितज्ञांचा बागायत शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लासलगाव : निसर्गाच्या लहरीपणा आता फळबागायत शेतकऱ्यांवर बेतत आहे. आतापर्यंत खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतरही पावसामध्ये सातत्य असल्याने रब्बीच्या पेरण्या ह्या रखडलेल्या होत्या तर आता द्राक्ष बागा अंतिम टप्प्यात असताना ( Untimely rains) अवकाळी पाऊस आणि सकाळच्या प्रहरातील धुके यामुळे (grape orchard farmers) द्राक्षांची गळ वाढलेली आहे तर डावणी, करपा या रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक फटका हा निफाड तालुक्यातील बागायत शेतकऱ्यांना बसलेला आहे.

जिल्ह्यात फळबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. वाढत्या उत्पादनामध्ये आता दिवसेंदिवस घट होत आहे तर निसर्गाच्या लहरीपणाचा देखील सामना फळबागायत शेतकऱ्यांना करावा लागत आहे. रोगांचा प्रार्दुभावाने हातातोंडाशी आलेल्या घास हिरावून जात असल्याने अस्मानी सुल्तानी संकटात द्राक्ष उत्पादक भरडला जातोय.

द्राक्ष बागेत मोकळी कॅनोपी गरजेची

पावसामुळे बागेतील आर्द्रता वाढली असून काडीवर कॅनॉपीही जास्त प्रमाणात तयार झालेली आहे. पाऊस आणखी काही दिवस राहीला तर घड कुजण्याची समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे लवकर फळछाटणी झालेल्या बागांमध्ये द्राक्ष घड वाढीच्या अवस्थेत आहेत. या बागांमध्ये सध्याच्या वाढलेल्या आर्द्रतेमुळे भुरी व केवडा या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. बागेत मोकळी कॅनोपी असणे आवश्यक आहे. त्यामुळे सूक्ष्म वातावरण निर्माण होणार नाही. सर्वसामान्य दाट कॅनॉपीमधे रोगकारक घटकांची वेगाने वाढ होते व त्याचा प्रसार घडापर्यंत होतो. हे टाळणासाठी प्रत्येक काडी सुटसुटीत राहील याकडे लक्ष गरजेचे असल्याचे कृषितज्ञ कैलास भोसले यांनी सांगितले आहे.

असे करा व्यवस्थापन

बागेमध्ये काड्या तारेवर बांधून घ्याव्यात. काडीवर निघालेल्या बगलफुटीसुद्धा काढून घ्याव्या लागणार आहेत. त्याचबरोबर काडीच्या तळातील 3 ते 4 पाने काढून दोन फांद्या दरम्यान योग्य अंतर ठेवले तर वेलीमध्ये योग्य हवा खेळती राहणार आहे. त्यामुळे फवारणी पूर्ण कॅनॉपीमध्ये होईल सूर्यप्रकाश प्रत्येक भागाला मिळाल्यामुळे रोगांच्या प्रसारास आळा घालता येईल पानाच्या पृष्ठभागावर बुरशीनाशक, धूळ किंवा स्टिकरचा लेप तयार होऊ देऊ नये. शिवाय द्राक्षाची पाने निरोगी व रोगमुक्त ठेवावी लागणार आहेत.

पाऊस अन् धुक्याचा दुहेरी फटका

वातावरण बदलामुळे मणीगळ मोठ्या प्रमाणाात झाली आहे तर घडही कुजलेल्या अवस्थेतच वाढत आहेत दिवसभर पाऊस आणि सकाळच्या प्रहरी दाट धुके हे सर्वकाही द्राक्षबागेच्या नुकसानीसाठीच पोषक वातावरण झाले आहे. अनेक बागांचे सौदे झाले होते पण वातावरणातील बदलामुळे व्यापारी हे फिरकतच नाहीत. 15 ऑक्टोंबर रोजीच ज्ञानेश्वर राखुंडे यांची बाग जाणार होती पण वातारवरणामुळे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे.

संबंधित बातम्या :

एकरकमी ‘एफआरपी’ तर सोडाच पण ऊसबिलही हप्त्याने देण्यासाठी साखर कारखान्यांची अनोखी शक्कल

खरीप, भातशेतीनंतर आता फळबागांना अवकाळीचा फटका, सिंधुदुर्गात फळ बागायतदार अडचणीत, काय आहे उपाययोजना?

शेततळ्यांच्या संदर्भात राज्य सरकारची मोठी घोषणा, शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी