AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cotton Crop : खरिपात बहरणार ‘पांढर सोनं’, दर वाढीचा परिणाम की आणखीन काही? वाचा सविस्तर

उत्पादन वाढले तर दर कमी होणार याची धास्ती शेतकऱ्यांना असते, पण कापसाच्या बाबतीत असे होणार नाही. कारण यंदा उत्पादन घटल्याने मागणी एवढा पुरवठा हा झालेलाच नाही. त्यामुळे आगामी काळात उत्पादन वाढले तरी खरेदीविना त्याची परवेड होणार नाही असा विश्वास आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपात सोयाबीनचा पेरा अधिक की कापसाचा हेच पहावे लागणार आहे.

Cotton Crop : खरिपात बहरणार 'पांढर सोनं', दर वाढीचा परिणाम की आणखीन काही? वाचा सविस्तर
यंदाच्या खरीप हंगामात कापसाचे क्षेत्र वाढेल असा अंदाज आहे.
| Updated on: May 04, 2022 | 4:10 PM
Share

जळगाव : आतापर्यंत कापसाचे दर आणि साठवूक याची चर्चा होती पण आता (Kharif Season) खरीप हंगामाचे वेध लागले असून यंदाच्या खरिपात कापूस लागवडीचे चित्र काय राहणार याची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. (Cotton Rate) कापसाला मिळालेला विक्रमी दर आणि वाढती मागणी या दोन्ही बाबी यंदा (Cotton Cultivation) कापूस लागवडीसाठी पोषक राहणार आहेत. यंदाचा कापूस हंगामही देशासाठी चांगला राहणार असल्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केला आहे. विक्रमी दरापेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी कायम राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन वाढले तरी विक्रीची हमी मिळत आहे. याच कारणामुळे यंदा कापसाच्या क्षेत्रात वाढ होईल असा अंदाज आहे.

उत्पादन वाढले तरी चिंता नाही

उत्पादन वाढले तर दर कमी होणार याची धास्ती शेतकऱ्यांना असते, पण कापसाच्या बाबतीत असे होणार नाही. कारण यंदा उत्पादन घटल्याने मागणी एवढा पुरवठा हा झालेलाच नाही. त्यामुळे आगामी काळात उत्पादन वाढले तरी खरेदीविना त्याची परवेड होणार नाही असा विश्वास आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपात सोयाबीनचा पेरा अधिक की कापसाचा हेच पहावे लागणार आहे.

पोषक वातावरण राहिल्यास उत्पादनात वाढ

गेल्या काही वर्षापासून शेती उत्पादनात निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा अडसर ठरत आहे. त्यामुळे गतवर्षी सरासरीएवढेही कापसाचे उत्पादन शेतकऱ्यांचे पदरी पडले नाही. यंदा तर पोषक वातावरण राहिले तर देशात 2 दशलक्ष टनांनी उत्पादन वाढेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जगभरात लागवड क्षेत्राच वाढ तर निश्चित मानली जात आहे पण उत्पादन हे निसर्गावरच अवलंबून आहे.मात्र, कापूस उत्पादित झाला तर मात्र, शेतकऱ्यांचाच अधिकचा फायदा होणार आहे.

सोयाबीन-कापसामध्ये स्पर्धा

खरीप हंगामात सोयाबीन हेच मुख्य पीक आहे. यंदा सोयाबीनला सरासरीएवढा दर मिळाला तर कापसाच्या दरात दुप्पटीने वाढ झाली होती. त्यामुळे ज्या भागात कापसाकडे दुर्लक्ष केले गेले होते त्या क्षेत्रात आता काय होणार हे पहावे लागणार आहे. यंदा कापसाच्या क्षेत्रात वाढ ही निश्चित मानली जाते. पण शेतकऱ्यांनी जो पीक पध्दतीमध्ये बदल केला जाणार आहे त्याचा फायदा  होईल की नाही हे पहावे लागणार आहे.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.