कापूस उत्पादकांना अधिकच्या दराची संधी, दिवाळी पर्यंत करावी लागणार प्रतीक्षा

| Updated on: Oct 16, 2021 | 4:41 PM

कापसामधून जर अधिकचे उत्पादन हवे असेल तर शेतकऱ्यांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. आणि तरच पांढऱ्या सोन्याला अधिकचा आणि हमी दर मिळणार आहे. कारण कापूस पणन महासंघाची खरेदी प्रक्रिया सुरू झाल्यावर राज्यातील शेतकऱ्यांच्या लक्ष लागले होते ते खरेदी केंद्राकडे. आता दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर कापूस खरेदी सुरू होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कापूस उत्पादकांना अधिकच्या दराची संधी, दिवाळी पर्यंत करावी लागणार प्रतीक्षा
संग्रहित
Follow us on

मुंबई : खरीपातील सोयाबीनच्या दरात दिवसेंदिवस घट होत आहे. (Cotton will get the expected rate, ) त्यामुळे आर्थिक अडचणीत असून आता कापूस तोडणीलाही सुरवात झाली आहे. मात्र, (cotton production) कापसामधून जर अधिकचे उत्पादन हवे असेल तर शेतकऱ्यांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. आणि तरच पांढऱ्या सोन्याला अधिकचा आणि हमी दर मिळणार आहे. कारण कापूस पणन महासंघाची खरेदी प्रक्रिया सुरू झाल्यावर राज्यातील शेतकऱ्यांच्या लक्ष लागले होते ते खरेदी केंद्राकडे. आता दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर कापूस खरेदी सुरू होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कापसानला योग्य दर तर मिळेलच पण शिवाय हमीभाव असल्याने नुकसान तर होणार नाही.

खरीप हंगामात राज्यात 39.37 लाख हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली असून त्यापैकी 75 लाख गाठींचे उत्पादन होईल असा अंदाज आहे. पणन महासंघाकडून राज्यातील 116 तालुक्यांमधील 124 कापूस खरेदी केंद्रांवर कापूस खरेदीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. पणन महासंघाकडून 50 केंद्रांवर आणि सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड) च्या 74 केंद्रांवर कापूस खरेदी केला जाईल आणि चांगल्या प्रतीच्या कापसाला 6028 रुपयांची हमीभाव दिला जाईल.

खरेदी केंद्रावर जाण्यापूर्वीची काळजी

मुसळधार पाऊस आणि राज्यात अतिवृष्टीमुळे सुमारे 6.5 लाख हेक्टर कापसाचे नुकसान झाले आहे. परिणामी अपेक्षित उत्पादनात घट होणार असल्याचे कॉटन मार्केटिंग फेडरेशनने स्पष्ट केले आहे. असे असले तरी, कोणताही शेतकरी 12 क्विंटलपेक्षा अधिकचा कापूस विक्रीसाठी आणू शकणार नाही. 12 % पेक्षा जास्त आर्द्रता असेल तर तो कापूस स्वीकारला जाणार नाही. कापूस विपणन महासंघाचे संचालक सुरेश चिंचोलकर यांनी शेतकऱ्यांना सुका कापूस घेऊन यावा शिवाय कापूस खरेदी केंद्रावर येताना बैलगाडी, ट्रॅक्टर किंवा चारचाकी वाहनातून कापूस आणावा असे आवाहन केले आहे.

केंद्रावर ही कागदपत्रे गरजेची

कापूस विक्रीसाठी आणताना शेतकऱ्यांनी कापूस पिकाच्या नोंदीसह अद्ययावत सातबारा तसेच राष्ट्रीयकृत बँक खात्यासह पासबुकची झेरॉक्स कागदपत्रांसह आणावी ज्यात बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड उल्लेख असणे आवश्यक आहे. आधार कार्ड, सातबारा उतारा, ओळखपत्र आदी कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे.

26 ऑक्टोंबर रोजी बैठक

कापूस खरेदीच्या अनुशंगाने राज्यातील सर्व संचालकांची मुंबई येथे बैठक पार पडणार आहे. त्यावेळी खरेदीचे नियोजन कसे करायचे हे ठरविले जाणार आहे. तर कापूस विक्रीच्या आठ दिवसाच्या आतमध्येच पैसे अदा केले जाणार आहेत. राज्यात सर्वात जास्त पांढऱ्या सोन्याचे उत्पादन करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात 4 लाख 43 हजार हेक्टरवर कापसाची लागवड केली आहे. (Cotton will have to wait till Diwali, however, at the expected rate)

संबंधित बातम्या :

भाजीपाला उत्पादन वाढवण्यासाठी ‘स्टॅकिंग’ पध्दत ; उत्पादन अधिक नुकसान कमी

सोयबीनचे दर घटूनही का वाढत आहे आवक ? सोयाबीनच्या दराचा भरवासाच राहिला नाही

ऊस कारखानेच करीत आहेत एकरकमी ‘एफआरपी’ ची घोषणा, काय आहे पडद्यामागची गोष्ट ?