AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोयबीनचे दर घटूनही का वाढत आहे आवक ? सोयाबीनच्या दराचा भरवासाच राहिला नाही

मध्यंतरी आठ दिवसासाठी दर स्थिर राहिले होते पण पुन्हा घसरण ही कायम आहे. (Latur Market) आता चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला 5100 तर सर्वसाधारण 4800 चा दर मिळत आहे. दर घटूनही आवक मात्र वाढत आहे. (Reduction in soyabean prices) भविष्यातील दराबाबतही शेतकऱ्यांना आता आशा राहिलेली नसल्यानेच मिळेल त्या दरात सोयाबीनची विक्री केली जात आहे.

सोयबीनचे दर घटूनही का वाढत आहे आवक ? सोयाबीनच्या दराचा भरवासाच राहिला नाही
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 16, 2021 | 2:38 PM
Share

लातूर : हंगामाच्या सुरवातीला 11 हजार क्विटंलचा विक्रमी दर सोयाबीनला (Soyabean Market) मिळालेला होता. मात्र, त्यानंतर सुरु झालेली उतरती कळा आजही कायम आहे. गेल्या महिन्याभरात एकदाही सोयाबीनने उचल खाल्लेली नाही. मध्यंतरी आठ दिवसासाठी दर स्थिर राहिले होते पण पुन्हा घसरण ही कायम आहे. (Latur Market) आता चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला 5100 तर सर्वसाधारण 4800 चा दर मिळत आहे. दर घटूनही आवक मात्र वाढत आहे. (Reduction in soyabean prices) भविष्यातील दराबाबतही शेतकऱ्यांना आता आशा राहिलेली नसल्यानेच मिळेल त्या दरात सोयाबीनची विक्री केली जात आहे. शनिवारी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 20 हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक आवक झाली होती.

हंगामाच्या सुरवातीला जो दर सोयाबीनला होता तो आज निम्म्यापेक्षाही कमी झाला आहे. किमान 6 हजारावर का होईना दर स्थिर होतील अशी आशा शेतकऱ्यांना होती पण तसे चित्र बाजारपेठेत नाही. पावसाने झालेले नुकसान, केंद्र सरकारचे धोरण या सर्वांचा परिणाम हा सोयाबीनच्या दरावर झाला आहे. आता पर्यंच सोयाबीनची काढणी-मळणी ही कामे रखडलेली होती. पण गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीनची मळणी झाली की थेट बाजारात आणले जात आहे.

सणासुदीत शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. यातच खरीपातील कोणतेच उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी हे पडलेले नाही. शिवाय खरीपातील पीके जोपासण्यात अधिकचा खर्च होऊनही चार पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. आता दर दिवसेंदिवस घटत आहेत. भविष्यात हीच स्थिती राहिली तर जास्तीचे नुकसान होईल म्हणून पडेल त्या दरात सोयाबीनची विक्री करण्याचा निर्णय शेतकरी घेत आहेत.

शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री करावी की साठवणूक

सोयाबीनची काढणी कामे आता अंतिम टप्प्यात आहेत. शिवाय पावसामुळे सोयाबीनच्या दर्जावरही परिणाम झालेला आहे. अशा परस्थितीमध्ये चांगला दर मिळेपर्यंत सोयाबीनची साठवणूक करावी का लागलीच विक्री करावी याबाबत शेतकऱ्यांच्या मनात द्वीधा स्थिती आहे. सोयाबीनची विक्रीच शेतकऱ्यांच्या फायद्याची राहणार असल्याचे मत व्यापारी व्यक्त करीत आहेत. कारण भविष्यात यापेक्षा अधिकची आवक तर होणारच आहे पण सोयापेंड आणि दिवसेंदिवस खाद्यतेलावरील कमी केले जात असलेले आयातशुल्क यामुळे भविष्यात यापेक्षा दर कमी होतील असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 5 हजाराचा दर मिळत असून याच दरात विक्री केली तर भविष्यातील संकट टळणार आहे.

खळ्यावरील सोयाबीन थेट बाजारात

सध्या पावसाने उघडीप दिल्याने काढणी आणि मळणी ही दोन्हीही कामे उरकून घेण्यावर शेतकऱ्यांनी भर दिलेला आहे. पावसामुळे सोयाबीन हे डागाळलेले आहे. त्याचा दर्जाही खालावलेला आहे. त्यामुळे साठवणूक केली तरी त्याला बुरशी लागून खराबी होणार शिवाय यापेक्षा कमी दराने भविष्यात विक्री करण्याची नामुष्की आली तर काय ? हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे. त्यामुळे खळ्यावक मळणी झाली की सोयाबीन थेट बाजारात दाखल केले जात आहे.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शनिवारी लाल तूर- 6188 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6375 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6100 रुपये क्विंटल, जानकी चना 4950 रुपये क्विंटल, विजय चणा 5050, चना मिल 4850, सोयाबीन 5400, चमकी मूग 7100, मिल मूग 6250 तर उडीदाचा दर 7200 एवढा राहिला होता. (Despite the decline in soyabean prices, the emphasis on the sale of farmers is, what are the reasons?)

संबंधित बातम्या :

ऊस कारखानेच करीत आहेत एकरकमी ‘एफआरपी’ ची घोषणा, काय आहे पडद्यामागची गोष्ट ?

जगातली सर्वात तिखट मिरची, तीन तुकडे खाल्ले तर ‘जागतिक रेकॉर्ड’ अन् चार खाल्ले तर ‘गिनीज वर्ल्ड’ रेकॉर्डमध्ये नोंद

लाल कांदा तळपलाः नाशिकमध्ये क्विंटलमागे 5151 रुपयांचा भाव; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेची झुळुक!

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.