जगातली सर्वात तिखट मिरची, तीन तुकडे खाल्ले तर ‘जागतिक रेकॉर्ड’ अन् चार खाल्ले तर ‘गिनीज वर्ल्ड’ रेकॉर्डमध्ये नोंद

आहो त्या मिरचीचे तीन तुकडे जरी खाल्ले तरी जागतिक विक्रम होणार आहे आणि एक जास्त तुकडा खाल्ला तर थेट गिनीज वर्ल्डमध्येच रेकॅार्ड. आहे आश्चर्य. हो हे खरंय आणि या लवंगी मिरचीचे नाव आहे 'कॅरोलिना रीपर' ही अमेरिकेत पिकवली जाते. जाणून घेऊ या अगळ्यावेगळ्या मिरचीबद्दल....

जगातली सर्वात तिखट मिरची, तीन तुकडे खाल्ले तर 'जागतिक रेकॉर्ड' अन् चार खाल्ले तर 'गिनीज वर्ल्ड' रेकॉर्डमध्ये नोंद
'कॅरोलिना रीपर' जगातिल सर्वाच तिखट मिरची

मुंबई : हिरवी गावरान मिरची खाल्ली तर अंगाचा लाहीलाही होते. पण जगात मिरचीचा असा एक प्रकार आहे तो पाहून तुम्ही हैराण होताल. आता मिरचीत एवढं काय? असा सवाल तुमच्या मनात असेल पण आम्ही ज्या मिरचीबद्दल सांगणार आहोत ही तिची सर्व वैशिष्टेच समजा. आहो त्या मिरचीचे तीन तुकडे जरी खाल्ले तरी जागतिक विक्रम होणार आहे आणि एक जास्त तुकडा खाल्ला तर थेट गिनीज वर्ल्डमध्येच रेकॅार्ड. आहे आश्चर्य. हो हे खरंय आणि या लवंगी मिरचीचे नाव आहे ‘कॅरोलिना रीपर’ ही अमेरिकेत पिकवली जाते. जाणून घेऊ या अगळ्यावेगळ्या मिरचीबद्दल….

‘कॅरोलिना रीपर’ मिरचीचे वेगळेपण

* मिरची ही तिखट असते ही सर्वसामान्य गोष्ट असते पण ‘कॅरोलिना रीपर’ ही मिरची एवढी तिखट आहे की जागतिक स्तरावर हीची नोंद घेण्यात आली आहे. ही मिरची आपल्या सिमला मिरचीसारखी दिसते. या मिरचीचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ‘जगातील मसालेदार मिरची’ म्हणून नोंदवले गेले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, कॅरोलिना रीपर सारख्या जगात इतक्या मसालेदार मिरच्या कधीच घडल्या नाहीत. हे सामान्य मिरच्यांपेक्षा 440 पट जास्त मसालेदार मानले जाते.

* साधारण:ता मिरचीचा एसयू (हीट्स युनिट) 5000 च्या जवळपास असतो. अशी मिरचीचे सेवण करणेही मुश्किल असते. तर या मिरचीचे एसयू तपासणी ही 2012 मध्ये दक्षिण कॅरोलिना येथील विंथलॉप विद्यापीठाने केली होती, ज्यात 15,69,300 एसएचयू किंवा स्कोवेल हीट युनिट्स सापडले. जे इतर मिरचीच्या तुलनेत 440 पटीने अधिक आहे. त्यामुळे हे क्वचित लोक सेवण करु शकतात.
या मिरचीचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ‘जगातील मसालेदार मिरची’ म्हणून नोंदवले गेले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, कॅरोलिना रीपर सारख्या जगात इतक्या मसालेदार मिरच्या कधीच घडल्या नाहीत. हे सामान्य मिरच्यांपेक्षा 440 पट जास्त मसालेदार मानले जाते.

* एका माणसाने १० सेकंदांपेक्षाही कमी वेळात या तीन मिरच्या खाल्ल्या होत्या. त्यानंतर त्याचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले होते. यापूर्वी कोणीही ही मिरची इतक्या वेगाने खाल्ली नव्हती. कारण त्यातील फक्त एक छोटासा तुकडाच लोकांची स्थिती बिघडवू शकतो.

* 2018 मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील एका 34 वर्षीय तरुणाने मिरची खाण्याच्या स्पर्धेत भाग घेतला आणि जगातील मसालेदार मिरच्या इतक्या खाल्ल्या की त्याचे डोके दुखू लागले. एवढेच नाही तर त्याला लागलीच रुग्णालयात दाखल करावे लागले. या मिरचीचा एक तुकडा खाल्ल्याने माणसाची स्थिती बिघडते.

* या मिरचीच्या आधी भारताची ‘घोस्ट झोलाकिया’ ही जगातील मसालेदार मिरची मानली जात होती. 2007 मध्ये ‘घोस्ट झोलाकिया’चा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला. तर 2013 मध्ये ‘कॅरोलिना रीपर’ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये जगातील मसालेदार मिरची म्हणून त्याचा समावेश करण्यात आला आहे. (Carolina Reaper is the world’s best spicy chilli, once seved, affects health)

संबंधित बातम्या :

लाल कांदा तळपलाः नाशिकमध्ये क्विंटलमागे 5151 रुपयांचा भाव; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेची झुळुक!

अतिवृष्टीतून वगळण्यात आलेल्या ‘त्या’ 48 गावातील पीकांचेही होणार पंचनामे ; पुनर्वसन मंत्र्यांचे आदेश

मराठवाड्याला निकषांपेक्षा अधिकची नुकसानभरपाई, पहा तुमच्या जिल्ह्याला कितीची मदत?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI