AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोष्ट पडद्यामागची : शेतकऱ्यांचा रोष पीकविमा कंपन्यावर, मात्र विमा परतावा रखडण्याचे नेमके कारण काय?

खरीप हंगामातील पीक नुकसानीनंतरही विमा कंपन्यांनी वेळेत पैसे अदा केले नाहीत म्हणून शेतकऱ्यांचा रोष विमा कंपन्यांवर तर आहेच. पण नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा दुसरा हप्ता रखडला असून यामागे वेगळेच कारण आहे. यामागेही विमा कंपन्यांचा मनमानी कारभार असेल तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे.

गोष्ट पडद्यामागची : शेतकऱ्यांचा रोष पीकविमा कंपन्यावर, मात्र विमा परतावा रखडण्याचे नेमके कारण काय?
पीक विमा योजना
| Edited By: | Updated on: Feb 13, 2022 | 11:52 AM
Share

नांदेड :  (Kharif Season) खरीप हंगामातील पीक नुकसानीनंतरही विमा कंपन्यांनी वेळेत पैसे अदा केले नाहीत म्हणून शेतकऱ्यांचा रोष (Crop Insurance Company) विमा कंपन्यांवर तर आहेच. पण नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा दुसरा हप्ता रखडला असून यामागे वेगळेच कारण आहे. यामागेही विमा कंपन्यांचा मनमानी कारभार असेल तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. कारण दुसऱ्या हप्त्यासाठी (Central Government) केंद्र आणि राज्य सरकारनेच अजून त्यांच्या हिस्स्याचा निधी वर्ग केला नसल्याचे समोर आहे. त्यामुळे पीकविम्याचे 131 कोटी रुपये रखडलेले आहेत. याबाबत विमा कंपन्यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे नुकसानीच्या पाच महिन्यांनतरही शेतकऱ्यांना भरपाईची प्रतिक्षा आहे. आता रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असून शेतकरी खरिपातील नुकसानभरपाईची प्रतिक्षा करीत आहे.

9 लाख 10 हजार शेतकऱ्यांनी भरला होता विमा

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आता सावध भूमिका घेत आहे. त्यामुळेच विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय नांदेड जिल्ह्यातील प्रशासन सतर्क असल्यामुळे विमा योजनेत तब्बल 9 लाख 10 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये तूर, उडीद, मूग, कापूस, ज्वारी आणि सोयाबीन पिकांचा सहभाग होता. एकट्या सोयाबीनसाठी 44 कोटी 95 लाख रुपयांचा विमा हप्ता शेतकऱ्यांनी भरला होता. या माध्यमातून आणि केंद्र व राज्य सरकारचा असे मिळून विमा कंपनीकडे 630 कोटी 80 लाख रुपयांचा विमा हप्ता जमा झाला होता. या निधीच्या आधारे 5 लाख 16 हजार हेक्टरावरील क्षेत्र हे संरक्षित करण्यात आले होते.

पहिल्या टप्प्यातील रक्कम जमा

पीकविमा हप्ता अदा केल्यानंतर लागलीच अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे कंपनीने नैसर्गिक आपत्ती घटकांमार्फत 7 लाख 35 हजार 811 अर्जदारांना 461 कोटी विमा परतावा मंजूर केला होता. त्यापैकी 73 टक्के नुसार 330 कोटींचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे पण उर्वरीत 27 टक्केनुसार 331 कोटींचा विमा अद्यापही रखडलेला आहे.

शेतकऱ्यांना दुसऱ्या हप्त्याची प्रतिक्षा

खरीप हंगाम संपून सहा महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. असे असताना शेतकऱ्यांना अद्यापही विम्याचे पैसे मिळालेले नाहीत आतापर्यंत विमा कंपन्याना समोर केले जात होते. पण दुसऱ्या हप्त्यामधील रक्कम ही केंद्र आणि राज्य सरकारकडेच आहेत. अजूनही ही रक्कम विमा कंपन्यांकडे अदा केलेली नाही. त्यामुळे प्रक्रिया रखडली आहे. उर्वरीत हप्त्यासाठी शेतकऱ्यांना 131 कोटी रुपयांची अपेक्षा आहे मात्र, याबाबत सरकार काय निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Onion Crop : पारा घसरला अन् शेतकऱ्यांची धाकधूक वाढली, मुख्य आगारात कांद्याची काय स्थिती?

Rabi Season: कडधान्यच जोमात, मुख्य पिकांची काय अवस्था? शेतकऱ्यांचा निर्णय योग्य की अयोग्य? वाचा सविस्तर

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी: आता उरले दोनच दिवस, ‘ही’ प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा नुकसानभरपाईला मुकावे लागणार

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.