Amravti : असा हा पाऊस, पिकांसह शेतजमिनी खरडून गेल्या, लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना

गत महिन्यात प्रतिकूल परस्थिती असतानाही शेतकऱ्यांनी हात उसणे घेऊन चाड्यावर मूठ ठेवली ती ही बेभरवश्याची. असे असताना रिमझिम पावसावर पिकांची उगवणही झाली. मात्र, सावरखेड येथे झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे ना पैसा आहे ना यंत्रणा.

Amravti : असा हा पाऊस, पिकांसह शेतजमिनी खरडून गेल्या, लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना
अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यातील सावरखेड येथील शेतजमिनही खरडून गेली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 9:25 AM

अमरावती : गतआठवड्यापर्यंत राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याचे डोळे हे आभाळाकडे लागले होते. (Monsoon) पावसाच्या भरवश्यावर जमिनीत गाढलेल्या (Kharif Season) बियाणांचे काय होणार हाच प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होता. मात्र, गेल्या आठ दिवसांमध्ये निसर्गाचा लहरीपणा काय असतो याचा प्रत्यय अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आला आहे. जिल्ह्यातील सावरखेडा परिसरात असा काय (Heavy Rain) पाऊस झाला आहे की, पिकांसह शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. ज्या पावसाची प्रतिक्षा शेतकऱ्यांना होती त्याच पावसाने पिके तर पाण्यात गेली पण आता दुबार पेरणी करावी तरी कुठे हा प्रश्न जमिन खरडून गेल्याने निर्माण झाला आहे. शेतकरी संकटात असताना त्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी ना प्रशासकीय अधिकारी फिरकले आहेत ना लोकप्रतिनीधी.

पेरणीनंतरही समस्या कायम

उत्पादन आणि उत्पन्न या दोन्हीच्या अनुशंगाने खरीप हंगाम महत्वाचा असतो. यंदा पावसाने ओढ दिली तरी जून महिन्याच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांनी पेरणीचे धाडस केले. धूळपेरणी करुन शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होता. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली नाहीतर दुबार पेरणी ही ठरलेलीच होती. पण गेल्या काही दिवसांपासून पावसामधील सातत्य आणि मुसळधार सरी यामुळे पिके तर सोडाच पण शेत जमिनीही देखील खरडून गेल्या आहेत. त्यामुळे पेरणी होऊनही शेतकऱ्यांच्या समस्या ह्या कायम आहेत.

दुबार पेरणी करावी तरी कशी?

गत महिन्यात प्रतिकूल परस्थिती असतानाही शेतकऱ्यांनी हात उसणे घेऊन चाड्यावर मूठ ठेवली ती ही बेभरवश्याची. असे असताना रिमझिम पावसावर पिकांची उगवणही झाली. मात्र, सावरखेड येथे झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे ना पैसा आहे ना यंत्रणा. शिवाय याचा मेळ घातला तरी ज्या जमिनीवर पेरणी करायची जी जमिनच वाहून गेली आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरवातीला पावसाअभावी खरीप वाया जाणार अशी भीती होती तर आता अधिकच्या पावसाने खरीप वाया गेला आहे.

हे सुद्धा वाचा

नुकसानभरापाई दूरच, अधिकारीही फिरकले नाहीत

खरीप हंगामात शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्या बांधावर जाण्याच्या सूचना केल्या जातात. प्रत्यक्षात स्थिती काय आहे याचा प्रत्यय सावरखेड येथील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यावर येतेय. पावसामुळे होत्याचं नव्हतं झालं आहे. असे असताना शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळणे गरजेचे आहे. पण या शिवरात ना प्रशासकीय अधिकारी फिरकले आहेत ना लोकप्रतिनीधी. पंचनामे करुन तात्काळ मदतीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.