पावसानं दडी मारली, पीक वाटवण्यासाठी तरुणाची भन्नाट शक्कल, एकरातील कपाशीला जीवदान

जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी भोईटी या गावातील शेतकऱ्यांनी सुरुवातीला झालेल्या पावसानंतर आपल्या शेतात पेरणी केली. पेरणीनंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे मोठं संकट उभ टाकलं होतं.

पावसानं दडी मारली, पीक वाटवण्यासाठी तरुणाची भन्नाट शक्कल, एकरातील कपाशीला जीवदान
युवा शेतकरी
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 1:02 PM

धुळे: जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी भोईटी या गावातील शेतकऱ्यांनी सुरुवातीला झालेल्या पावसानंतर आपल्या शेतात पेरणी केली. पेरणीनंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे मोठं संकट उभ टाकलं होतं. परंतु दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी तरुण शेतकऱ्याने एक शक्कल लढविली आहे. (Dhule Farmer Vinesh Pavara supply water by plastic bag due to lack of rain)

शेतकऱ्यांसमोर पीक वाचवण्याचं आव्हान

शिरपूर तालुक्यात जून महिना उलटल्यानंतरही म्हणावा तसा पाऊस झाला नसल्यामुळे पेरणी करून देखील शेतकऱ्याच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. शिरपूर तालुक्यातील रोहिणी भोईटी या ठिकाणच्या विणेश पावरा या तरुण शेतकऱ्याने आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये कपाशीची लागवड केली. परंतु पेरणीनंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले होते. परंतु विणेश पावरा या तरुण शेतकऱ्याने दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवत पिकाला पाणी देण्याची व्यवस्था केली.

पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याची भन्नाट आयडिया

संपूर्ण 1 एकर क्षेत्रामध्ये कपाशी पेरल्यानंतर कपाशीच्या बी मधून कोंब देखील बाहेर आल्याने शेतकऱ्याने प्रत्येक कपाशीच्या जवळ एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पाणी भरून त्या पिशवीला बारीक छेद करून त्यातून रोपाला जीवदान मिळेल इतके पाणी टिपटिप पिकाला मिळू लागले.

पीक जगवण्यात यश

पावसाने दडी मारल्यानंतर तब्बल आठ दिवस हा प्रयोग यशस्वी ठरला. पिशवी मधून मिळणाऱ्या थेंब-थेंब पाण्यामुळे कपाशीच्या बी मधून निघालेले कोंब काही इंच मोठे देखील झाले. त्यानंतर अचानक काल व आज पावसाचे आगमन झाल्यानंतर पावसाचे पाणी देखील पिकास मिळाल्याने तरुण शेतकऱ्यांनी लावलेली शक्कल यशस्वी ठरली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी पिकाला मिळू लागल्यामुळे शेतात ठेवलेल्या पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या शेतकऱ्याने काढून टाकल्या आहेत.

तूर्तास तरी दुबार पेरणीचे संकट टळलं असलं तरी यापुढेतरी पीक टिकविण्यासाठी समाधानकारक पाऊस होणं शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच असणार आहे.

इतर बातम्या:

चंद्रकांत पाटील म्हणाले अमित शाहांना पत्र लिहिणार, उदय सामंत म्हणतात हा तर सहकार मोडण्याचा डाव

भारताच्या बासमती तांदळाचा जगभर डंका, 125 देशांमध्ये 30 हजार कोटींची निर्यात

(Dhule Farmer Vinesh Pavara supply water by plastic bag due to lack of rain)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.