AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Seed : पेरणीआधी धरणीमातेची ओटी! कोल्हापूर प्रशासनाची अनोखी वात्सल्य योजना, बियाणांचा प्रश्नही निकाली

यंदाचे वर्ष शेतकरी महिला सक्षमीकरणासाठी असल्याचे राज्य सरकारने घोषित केले आहे. त्याला साजेसं काम कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने केलंय. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून वात्सल्य योजना राबवली जात असून या अंतर्गत जिल्हाभरातील विधवा शेतकरी महिलांना बियाणे ते ही घरपोच केले जात आहे.

Kharif Seed : पेरणीआधी धरणीमातेची ओटी! कोल्हापूर प्रशासनाची अनोखी वात्सल्य योजना, बियाणांचा प्रश्नही निकाली
वात्सल्य योजनेअंतर्गत कोल्हापूर येथे मोफत बियाणांचे वाटप करण्यात आले आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jun 18, 2022 | 5:19 PM
Share

कोल्हापूर :  (Corona) कोरोनाने अनेक निष्पापांचा बळी घेतला. घरातला कर्ता पुरुषच गेल्याने जिल्ह्यातील अनेक (Farmer Family) शेतकरी कुटुंबं अजूनही स्थिरावली नाहीत. वाढती महागाई आणि शेतीमालाचे घटते दर यामुळे यंदाच्या खरिपातात गाढायचे तरी काय असा सवाल निर्माण झाला आहे. खते, बी-बियाणे यांचे भरमसाठ दरामुळे पेरणीच मोठं आव्हान या विधवा शेतकरी महिलांवर होते. याच बाबीचा अभ्यास करुन (Kolhapur) कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून वात्सल्य योजनेअंतर्गत दिलासा देण्याचे काम केले आहे. विधवा शेतकरी महिलांना सोयाबीन आणि भुईमुगाचे बियाणे मोफत दिले जात आहे. राज्य स्तरावर दखल घ्यावा असा उपक्रम जिल्हा प्रशासनाने राबवला आहे.

काय आहे वात्सल्य योजना?

कोरोना काळात घरचा कर्ता पुरुष गेल्याने अनेकजण अनाथ झाले आहेत तर विधवा महिलांना आपल्या कुटुंबाचा गाडा चालविणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे अशा कुटुंबियांना 25 बाबींचा लाभ या वात्सल्य योजनेतून घेता येणार आहे. शासन आपल्या दारी माध्यमातून घर बसल्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या संदर्भात 27 ऑगस्ट रोजी राज्य सरकारने जीआर काढला होता. विधवा महिलांचा शासकीय कार्यालयाशी संपर्क येत नसल्याने थेट दारी जाऊन वेगवेगळ्या योजनेचा लाभ दिला जातो. अनाथ बालके आणि विधवा महिलांसाठी ही योजना राबवली जात आहे. विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे गरजेचे आहे. विविध गरजा लक्षात घेता सुरु करण्यात आलेल्या योजनेचे खरे सार्थक कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने केले आहे.

कृषी सेवकांमार्फत घरपोच बियाणे

यंदाचे वर्ष शेतकरी महिला सक्षमीकरणासाठी असल्याचे राज्य सरकारने घोषित केले आहे. त्याला साजेसं काम कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने केलंय. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून वात्सल्य योजना राबवली जात असून या अंतर्गत जिल्हाभरातील विधवा शेतकरी महिलांना बियाणे ते ही घरपोच केले जात आहे. यामुळे खरीप हंगामतर सुखकर होणार आहेच शिवाय बियाणांवर होणारा खर्च आता शेतीकामासाठी करता येणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

राज्य सरकारकडूनही कौतुकाची थाप

कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने सध्याच्या परस्थितीचा अभ्यास करुन हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे. 2021 मध्येच ही योजना राबवण्याचे राज्य सरकारने ठरवले होते. यंदा योजनेचे दुसरेच वर्ष असताना महिला शेतकऱ्यांना पाठबळ देणारा हा उपक्रम आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या विधायक उपक्रमाची नोंद राज्य पातळीवर देखील घेण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या आढावा बैठकी वेळी कृषी मंत्री दादा भुसे यांनी या संकल्पनेच कौतुक करत करत लवकरच ही योजना राज्यभर राबविण्याबाबत विचार होईल अस सांगितले आहे.

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...