लोकसहभागातून आता ‘ई-पीक पाहणी’चा उपक्रम, कृषी विद्यापीठातील विद्यार्थीही बांधावर

| Updated on: Oct 23, 2021 | 5:11 PM

आता 31 ऑक्टोंबरपर्यंत मुदतावाढ करण्यात आली असून अधिक शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी होण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. विद्यार्थ्यांनाच या विषयी मार्गदर्शन करुन शेतकऱ्यांच्या पीकांची नोंद अॅपमध्ये करण्याचा अभिनव उपक्रम बुलढाणा कृषी महाविद्यालयाने घेतला आहे.

लोकसहभागातून आता ई-पीक पाहणीचा उपक्रम, कृषी विद्यापीठातील विद्यार्थीही बांधावर
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : ‘ई-पीक पाहणी’च्या अंतिम टप्प्यात का होईना या मोहिमेने वेग घेतलेला आहे. राज्यात 90 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आपल्या पीकांची नोंदणी या अॅपच्या माध्यमातून केली आहे. आता 31 ऑक्टोंबरपर्यंत मुदतावाढ करण्यात आली असून अधिक शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी होण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. विद्यार्थ्यांनाच या विषयी मार्गदर्शन करुन शेतकऱ्यांच्या पीकांची नोंद अँपमध्ये करण्याचा अभिनव उपक्रम बुलढाणा कृषी महाविद्यालयाने घेतला आहे. यापूर्वी नांदेड जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनीही अशाच पध्दतीने पीक नोंदणी करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहीत केले होते. परिणामी राज्यात सर्वाधिक ई-पीक पाहणीची नोंदणी नांदेड जिल्ह्यात झाली आहे.

‘ई-पीक पाहणी’च्या माध्यमातून पीकांची नोंद करण्याची प्रक्रीया सोपी असली तरी शेतरकऱ्यांना नोंद करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही सर्व प्रक्रीया मोबाईलवरच असल्याने शेतकऱ्यांना त्यामधले ज्ञान अवगत नाही. मात्र, असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून नोंदणी ही वाढलेली आहे. आता 31 ऑक्टोंबर ही अंतिम मुदत दिलेली आहे. शेतकरी तर त्यांच्या पध्दतीने नोंदणी करीतच आहेत पण बुलढाणा येथील डॅा. राजेंद्र गाडे कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थीही आता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रात्याक्षिके दाखवत आहेत. त्यामुळे नोंदणी तर वाढत आहेच शिवाय काय अडचणी येतात याची निवारणही केले जात आहे.

ई-पीक पाहणीत नांदेड अव्वल

या मोहिमेच्या सुरवातीला शेतकरी याकडे दुर्लक्ष करीत होते तर ही जबाबदारी शेतकऱ्यांची असल्याचे सांगत महसूल विभागाचे अधिकारी कानडोळा करीत होते. त्यामुळे सुरवातीला नांदेड जिल्ह्यात कमी नोंदी झाल्या होत्या. ही बाब जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गावागावत जाऊन या अँपची माहिती शेतकऱ्यांना सांगण्याचे आदेश दिले होते. तर गावस्तरावर ज्यांना अत्याधुनिक प्रणालीची माहिती आहे अशा युवकांची नेमणूक केली होती. त्यामुळे नोंदणी ही वाढलेली आहे. वेगवेगळ्या उपक्रमामुळे नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पीक पेऱ्याच्या नोंदी झाल्या आहेत. चार दिवसांच्या अहवालानुसार जिल्ह्यात 3 लाख 52 हजार 691 शेतकऱ्यांच्या नोंदी केलेल्या होत्या.

विद्यार्थ्यांकडून काय मार्गदर्शन होते ?

शेतकऱ्यांचा थेट शेतात जाऊन शेतकऱ्यांना ई- पीक पाहणी अँप कसे डाऊनलोड करावे, मोबाईल अँप कसे हाताळावे, आपली नोंदनी अँप वर कशी करावी, पिकाची माहिती कसी भरावी, फोटो काढताना ला परवानगी देणे, भरलेली माहिती अपलोड करणे, अपलोड केलेली माहिती सर्व का पोहोचली का याची पडताळणी कुठे करायची यासंदर्भात प्रत्यक्ष प्रात्याक्षिक करून दाखविले व माहिती दिली. त्यामुळे शेतकरी स्वता: पुन्हा ई-पीक पाहणीच्या माध्यमातून नोंद करु शकरणार आहे.

ई-पीक पाहणी’चे असे आहेत फायदे

1) ‘ई-पीक पाहणी’ या अँपमुळे शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची अचूक नोंद होणार आहे. यामुळे ना शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे ना सरकारची फसवणूक.
2) या अॅपरील नोंदीमुळे राज्यात, देशात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला आहे याची अचूक आकडेवारी एका क्लिकर उपलब्ध होणार आहे.
3) पिकाच्या अचूक आकडेवारीमुळे उत्पादनाबद्दल अंदाज बांधता येतो. यावरुन भविष्यात बी-बियाणे लागणारे खत हे पण उपलब्ध करुन देता येणार आहे. शेतावरील गटावर झालेल्या पीक नोंदीचा फायदा हा देशात कीती क्षेत्रावर कीती ऊत्पन्न झाले हे सांगण्यासाठी देखील होणार आहे.
4) पिकाच्या छायाचित्रामुळे किती अक्षांश: आणि किती रेखाअंशावर कोणत्या पिकाचा पेरा झाला आहे हे समजले जाणार आहे.
5) एका मोबाईलहून 20 शेतकऱ्यांच्या नोंदी करता येणार आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल नसतो त्यामुळेच अशा प्रकारची सोय करण्यात आली आहे. (E-crop inspection initiative to help farmers in agricultural colleges through public participation)

संबंधित बातम्या :

हमीभाव केंद्राबाबत यंदा दुजाभावच, खरीप अंतिम टप्प्यात तरीही निर्णय प्रलंबीत

सोयाबीन दर्जेदार, दर मात्र कवडीमोल, शेतकऱ्यांनो ‘वेट अँड वॅाच’

डबल धमाका ..! शेतकऱ्यांना पी. एम किसान योजनेचे मिळणार दोन हप्ते !