Vineyard : उत्तर महाराष्ट्रात नुकसान तरीही पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे धाडस, म्हणे उसापेक्षा द्राक्षाला गोडवा

| Updated on: Apr 07, 2022 | 11:28 AM

शेतीमध्ये केवळ पीक पध्दतीमध्येच बदल झालेला नाही तर शेतकरीही अधिक कमर्शियल झाले आहेत. ऊस हे सर्वात मोठे नगदी पीक शिवाय माढा तालुक्यात साखर कारखाने आणि पोषक वातावरण असल्याने उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली होती. मात्र, ऊसासाठी कोणते क्षेत्र मर्यादित राहिलेले नाही. मराठवाड्यातही ऊसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात आता शेतकरी हे द्राक्ष बांगाकडे वळत आहेत. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे नाशिक, सांगली या जिल्ह्यांमध्ये द्राक्ष बागांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

Vineyard : उत्तर महाराष्ट्रात नुकसान तरीही पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे धाडस, म्हणे उसापेक्षा द्राक्षाला गोडवा
सोलापूर जिल्ह्यामध्ये द्राक्ष बागांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
Follow us on

माढा : संदीप शिंदे :  शेतीमध्ये केवळ (Crop Change)  पीक पध्दतीमध्येच बदल झालेला नाही तर शेतकरीही अधिक कमर्शियल झाले आहेत. ऊस हे सर्वात मोठे नगदी पीक शिवाय माढा तालुक्यात साखर कारखाने आणि पोषक वातावरण असल्याने (Sugarcane) उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली होती. मात्र, ऊसासाठी कोणते क्षेत्र मर्यादित राहिलेले नाही. मराठवाड्यातही ऊसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात आता शेतकरी हे (Vineyard) द्राक्ष बांगाकडे वळत आहेत. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे नाशिक, सांगली या जिल्ह्यांमध्ये द्राक्ष बागांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. असे असतान एकट्या माढा तालुक्यामध्ये 1 हजार 432 हेक्टरावर द्राक्ष बागा लावण्यात आल्या आहेत. यामधून एकरकमी उत्पन्न मिळते असा आशावाद शेतकऱ्यांना आहे. शिवाय रोजगारही उपलब्ध होत असल्याने द्राक्ष बागा क्षेत्रात वाढ होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.गतवर्षीच्या तुलनेत 350 हेक्टरने द्राक्ष बागा माढा तालुक्यात वाढलेल्या आहेत.

नदी क्षेत्रातील पिक पध्दतीमध्येही झाला बदल

पाण्याची उपलब्धता आणि योग्य शेतजमिन या जोरावर माढा तालुक्यात ऊसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली होती. शिवाय सर्वाधिक ऊसाचे गाळपही याच साखर कारखान्यातून होत असते.तालुक्यातील सीना नदी क्षेत्र तर ग्रीन बेल्ट म्हणून ओळखले जात आहे. पण ही ओळख आता इतिहासजमा होणार का अशीच स्थिती निर्माण झाली आहे. कारण ऊसाच्या जागी आता द्राक्ष बागा बहरत आहेत. शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला असला तरी द्राक्ष बाग लागवडीपासून ते तोडणीपर्यंत योग्य नियोजन केले तरच पीक पदरात पडणार आहे.

द्राक्ष बाग लागवडीचा असा आहे खर्च

जुनी ऊस शेती असो की अन्य पिकाची द्राक्ष बागेची लागवड करण्यासाठी प्रती एकरी 5 लाख खर्च येतो.यामध्ये तिन लाख रुपये लोखंडी फाऊंडेशन,दोन लाख रुपये रोपे औषधे,खते,ठिंबक सिंचन तर औषध फवारणीसाठी टॅक्टर घ्यायचा असल्यास 4 लाख रुपये आणखी खर्च येतो.योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास द्राक्ष बाग निश्चितच फायदेशीर ठरते. हे सर्व असले तरी वातावरणातील बदलामुळे काय होऊ शकते याचे नाशिक आणि सांगली जिल्ह्यातील उदाहरण समोर आहे. त्यानुसारच द्राक्ष बागांची योग्य जोपासणा शेतकऱ्यांना करावी लागणार आहे.

यामुळे शेतकऱ्यांचा द्राक्ष बागांवर भर

सोलापूर जिल्ह्यात सध्या जवळपास 15 हजार 7 हेक्टरवर द्राक्ष बागेची लागवड झाली आहे. तर माढा तालुक्यात 1 हजार 432 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली.गत वर्षीच्या तुलनेत यंदा 350 हेक्टर क्षेत्र तालुक्यात वाढले आहे.त्यामुळे ग्रामीण भागात द्राक्ष उत्पादन आणि रोजगार यातुन समृध्दी येत आहे. बदलता काळ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन जिल्ह्यातील तरुण शेतकरी वर्ग द्राक्ष लागवडीला पसंती देताना दिसत आहे.ऊसाला फाटा देऊन शेतकरी वर्ग द्राक्ष बागेला एकरकमी रक्कम मिळत असल्याने पसंती देत आहे.तालुक्यातील मानेगाव,कापसेवाडी या गावात सर्वाधिक लागवड आहे.

संबंधित बातम्या :

Sindhudurg : अवकाळी मुळावर, सर्वकाही हिरावूनही अणखी दोन दिवस धोक्याचेच, आंबा उत्पादकांच्या आशा मावळल्या

Amravati: देर आए दुरुस्त आए, रब्बीच्या अंतिम टप्प्यात मिळाली खरिपाची नुकसानभरपाई

Krishi Udan Scheme : शेतकऱ्यांचा शेतीमाल सातासमुद्रापार, असा घ्या योजनेचा लाभ..!