Natural Crisis: निसर्गाचा लहरीपणा त्यात कृषी विभागाची अनास्था, जगाचा पोशिंदा मात्र वाऱ्यावर

| Updated on: Jan 16, 2022 | 11:32 AM

आता कुठे रब्बी हंगामातील पिके बहरत होती. पण पुन्हा अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने किडीचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील शिरपूर, राहुर, फुलसावंगी या परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढले. कायम ढगाळ वातावरण असल्याने हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

Natural Crisis: निसर्गाचा लहरीपणा त्यात कृषी विभागाची अनास्था, जगाचा पोशिंदा मात्र वाऱ्यावर
उन्हाळी हंगामातील हरभरा पीक
Follow us on

यवतमाळ : गेल्या वर्षभरापासून राज्यभरातील शेतकरी हा (Natural Crisis) निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत आहे. खरीप हंगामातील पिकांचे तर नुकसान झालेच पण आता (Rabi Season) रब्बी हंगामातील पिकांवर देखील अवकाळी आणि ढगाळ वातावरणाचे संकट हे कायम आहे. आता कुठे रब्बी हंगामातील पिके बहरत होती. पण पुन्हा अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने किडीचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. (Yawatmal) यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील शिरपूर, राहुर, फुलसावंगी या परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढले. कायम ढगाळ वातावरण असल्याने हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये अशा प्रतिकूल वातावरणात कृषी विभागाने शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे असताना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे. त्यामुळे नेमके काय करावे याबाबत शेतकरी संभ्रमाात आहेत.

कृषी विभागामुळेच वाढला हरभरा पिकाचा टक्का

खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामातील पेरण्या ह्या लांबणीवर पडलेल्या होत्या. शिवाय सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने रब्बी हंगामात हरभरा पिकासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभऱ्याचाच पेरा करण्याचे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले होते. एवढेच नाही तर अनुदानाच्या स्वरुपात बियाणेही उपलब्ध करुन दिले होते. त्यामुळे सबंध राज्यात हरभऱ्याचे क्षेत्र हे वाढलेले आहे. मात्र. पेरा होताच वातावरणातील बदलामुळे मर आणि घाटी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे अपेक्षित असताना कृषी विभागाने वाऱ्यावर सोडल्याची भावना शेतकऱ्यांची झाली आहे.

पंचनामे करुन मदतीची मागणी

अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील हरभरा या मुख्य पिकालाच बसलेला आहे. पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे तर ढगाळ वातावरणामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. खरिपातील नुकसनीनंतरही शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीच्या अनुशंगाने अधिकचा खर्च करुन रब्बी हंगामात पीक पध्दतीमध्ये बदल केला पण निसर्गाचा लहरीपणा हा कायम राहिल्याने हरभरा, गहू या मुख्य पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पिकांची पाहणी करुन पंचनामे करण्याचा मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे कृषी विभाग काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे.

बीडमध्येही ढगाळ वातावरण, असे करा व्यवस्थापन

गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे हरभरा या पिकावर घाटी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ढगाळ वातावरणाचा सर्वाधिक परिणाम हा हरभरा पिकावर दिसू येत आहे. शिवाय हे पीक ऐन फुलोऱ्यात आल्याने घाटे लागण्याच्या अवस्थेतच घाटीअळीचा प्रादुर्भाव यामुळे थेट उत्पादनावरच परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा पिकावर निंबोळी अर्क + हिमामॅक्टिन बैनझाऐट किंवा एच.एन.पी.व्ही जैविक औषधांची फवारणी करण्याचा सल्ला कृषी तज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या :

Cilantro : पारंपारिक पिकांना कोथिंबीर भारी, बुरशीचा नायनाट अन् उत्पन्नात भर

व्वा रे पट्ट्या..! 2 बिस्कीट पुडे अन् ताक पिऊन अंगी हत्तीच बळ, ऊसतोड कामगाराचा असा ‘हा’ विक्रम तुम्ही होताल अवाक्

काय सांगता? ‘या’ कारणास्तव खानदेशातील खरेदी केंद्र बंद, घ्या जाणून