शेतकऱ्यांची चिंता वाढली! पुढील पाच दिवस शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, शेतकऱ्यांवर कोणतं संकट ?

आधीच अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांना मोठा दणका बसलेला असतांना आता पुन्हा शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट उभं राहण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली! पुढील पाच दिवस शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, शेतकऱ्यांवर कोणतं संकट ?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 13, 2023 | 3:05 PM

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांसमोर ( Farmer News ) येईल संकटाची मालिका सुरूच आहे. आता पुन्हा एकदा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलेला अंदाज शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवणारा ठरणार आहे. नुकतेच ढगाळ हवामानामुळे आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास ही निघून गेल्याची भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे आणि आता पुन्हा एकदा अवकाळी पाऊस होईल अशी शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. पुढील पाच दिवस अवकाळी पाऊस होण्याची शक्यता असल्याने कांदा उत्पादक शेतकरी, द्राक्ष बागायतदार आणि भाजीपाला उत्पादक यांची अधिक अडचण निर्माण झाली आहे.

आजपासून म्हणजे 13 मार्च पासून 17 मार्चपर्यन्त पाच दिवस राज्यातील हवामानात मोठा बदल होणार आहे. यामध्ये तुरळक पाऊस, विजा आणि गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शेवटचे दोन दिवस अधिक तीव्रतेची असण्याची शक्यता आहे.

जवळपास हा संपूर्ण आठवडाच शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंतेचा असणार आहे. अरबी आणि बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या वादळामुळे राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. इतर राज्यातही याचा फटका बसण्याची शक्यता हवमान विभागाने वर्तवली आहे.

हे सुद्धा वाचा

खरंतर शेतकऱ्यांना रब्बी आणि खरीपाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असतो. पाऊस चांगला झाला की दुष्काळी भागात सुद्धा पीक शेतकरी घेऊ शकतो. तशी स्थिती उन्हाळ्यात नसते. त्यामुळे पावसाळा आणि उन्हाळ्याचे आठ महीने शेतकऱ्यांसाठी महत्वाची असतात.

मात्र, पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने उघडीप घेतली आणि नंतर पावसाने केलेल्या मुक्कामामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर आता हाती आलेले पीक शेतकऱ्यांना तारणार असल्याचे बोलले जात असतांना पुन्हा एकदा मोठे नुकसान झाले आहे.

नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला, गहू, कांदे आणि हरभरा अशी पीक भुईसपाट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पुन्हा संकट आल्यास आणखी मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

अवकाळी पावसात मोठे नुकसान झाले होते, मात्र काही प्रमानात पीक हातात आले होते. पण जर पुन्हा अवकाळी पाऊस आला तर मोठा फटका बसू शकतो अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली असून आता पुन्हा नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

त्यामुळे हा संपूर्ण आठवडा शेतकऱ्यांसाठी चिंतेचा असून पाऊस न आल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. मात्र जर पाऊस आल्यास आर्थिक फटका बसणार आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.