AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संत्र्याच्या फळगळतीला नुकसानभरपाईच नाही, बागायतदारांचे कोट्यावधींचे नुकसान

फळ काढणीच्या दरम्यान फळगळतीचा धोका असतो. असे असतानाही ना पंचनामे केले जात आहेत ना सर्व्हेक्षण त्यामुळे अमरावतीसह राज्यातील फळबागायतदारांचे कोट्यावधीचे नुकसान होत आहे. (Vidarbha) बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे संत्रा लागवड भागात ही फळगळती होत असून याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे.

संत्र्याच्या फळगळतीला नुकसानभरपाईच नाही, बागायतदारांचे कोट्यावधींचे नुकसान
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 09, 2021 | 6:10 PM
Share

अमरावती : खरीप- रब्बी हंगामातील पीकांचे नैसर्गिक नुकसान झाले तर त्याचे विम्यापोटी नुकसानभरपाई मिळते. मात्र, संत्रा फळाच्या बाबतीत असे होताना दिसत नाही. (fruit leakage ) कारण ऐन फळ काढणीच्या दरम्यान फळगळतीचा धोका असतो. असे असतानाही ना पंचनामे केले जात आहेत ना सर्व्हेक्षण त्यामुळे अमरावतीसह राज्यातील फळबागायतदारांचे कोट्यावधीचे नुकसान होत आहे. (Vidarbha) बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे संत्रा लागवड भागात ही फळगळती होत असून याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्व्हेक्षण व पंचनाम्याची मागणी केली आहे.

प्रामुख्याने संत्र्याची लागवड ही विदर्भात केली जाते. एकाच वाणातील अवलंबिता या कारणामुळे उत्पादकतेच्या बाबतीत नागपुरी संत्रा देशातील इतर संत्रा वाणाच्या तुलनेत पिछाडला आहे. यातच कीड-रोगांचा प्रादुर्भाव बागांमध्ये वाढीस लागल्याने अनेक शेतकऱ्यांना बागा काढून टाकण्याची वेळ आली. तर ऐन फळकाढणीच्या प्रसंगीच पावसाची संततधार आणि वातादरणात बदल यामुळे बुरशीजन्यरोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे फळगळतीचे पंचनामे करून मदत करण्याची मागणी बागायतदार हे करीत आहेत.

दरवर्षीचे नुकसान

दरवर्षी आंबिया बहरातील फळांची गळ ही ठरलेलीच आहेय त्यामुळे ऐन उत्पादन पदरी पडत असतानाच बागायत शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने आंबिया बहरातील फळांची गळ झाली. या वर्षी देखील कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर सर्व्हेक्षण, पंचनामे व भरपाईची मागणी झाली. मात्र, शासनाकडूनच याकडे दुर्लक्ष होत आहे.

आंबिया बहर म्हणजे नेमके काय?

आंबिया बहर हे नोव्हेंदर-डिसेंबर किंवा डिसेंबर जानेवारी मध्ये घेतले जाणारे फळपिकं आहेत. ज्यावेळी आंब्याला बहर येतो त्या दरम्यान हे फळपिक बहरात असते. यामध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्राबेरी यांचा समावेश होत आहे.

सर्वाधिक विम्याचे कवच द्रात्र फळपिकाला

आंबिया बहरातील सर्वाधिक विमा संरक्षित रक्कम ही द्राक्षासाठी देण्यात आली आहे. ही रक्कम 3 लाख 20 हजार असून या फळपिक उत्पादकाला याचा अधिकचा फायदा होणार आहे. फळनिहाय या विमा संरक्षित रक्कम व त्यामध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत ही ठरविण्यात आली आहे. अंतिम मुदत ही पुढीलप्रमाणे द्राक्ष- 15 ऑक्टोंबर, मोसंबी 31 ऑक्टोंबर, केळी 31 ऑक्टोंबर, पपई 31 ऑक्टोंबर, संत्रा 30 नोव्हेंबर, काजू 30 नोव्हेंबर, कोकण आंबा 30 नोव्हेंबर, स्ट्रॅाबेरी 14 नोव्हेंबर अशी मुदत ठरवून देण्यात आली आहे. (Farmers suffer financial loss due to lack of compensation for fruit leakage )

संबंधित बातम्या :

ऊसाची योग्य लागवड देईल भरघोस उत्पादन, शेतकऱ्यांनी ‘ही’ काळजी घ्यावी

‘ई-पीक पाहणी’ उरले फक्त 5 दिवस, नाही-नाही म्हणत शेतकऱ्यांनीही घेतले मनावर

(MSP) आणि (APMC) म्हणजे नेमके काय? शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहीती

निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.