AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांच्या हातामध्ये आता डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा

कृषी क्षेत्रात डिजिटल (Digital) प्रणाली वाढवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारही (Centrel Government) प्रयत्न करीत आहे. कारभारात नियमितता आणि योजनांचा थेट लाभ हा त्यामागचा उद्देश आहे. विविध माध्यमातून शेतकऱ्यांच्या समोर डिजिटल प्रणाली आणली जात आहे. याचाच एक नमुना म्हणून आता डिजिटल स्वाक्षरीत सुधारीत सातबारा थेट शेतकऱ्यांच्या हाती पडावा यासाठीची मोहिम राज्यसरकारच्यावतीने सुरु करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या हातामध्ये आता डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 5:50 PM
Share

लातूर : कृषी क्षेत्रात डिजिटल (Digital) प्रणाली वाढवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारही (Centrel Government) प्रयत्न करीत आहे. कारभारात नियमितता आणि योजनांचा थेट लाभ हा त्यामागचा उद्देश आहे. विविध माध्यमातून शेतकऱ्यांच्या समोर डिजिटल प्रणाली आणली जात आहे. याचाच एक नमुना म्हणून आता डिजिटल स्वाक्षरीत सुधारीत सातबारा थेट शेतकऱ्यांच्या हाती पडावा यासाठीची मोहिम राज्यसरकारच्यावतीने सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आता गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी हा डिजिटल सातबारा शेतकऱ्यांना मिळणार आहे. गावस्तरावर ग्रामसभांमध्ये याचे वाटप केले जाणार आहे.

काळाच्या ओघात शेती (Agricultural) व्यवसयात अमूलाग्र बदल हे होत आहेत. राज्य आणि केंद्र सरकार यासाठी प्रयत्नशील असून वेगवेगळे उपक्रम जेणेकरून डिजिटल प्रणाली शेतकऱ्यांना समजेल हा उद्देश सराकरचा राहिलेला आहे. डिजिटल स्वाक्षरीचे सातबारे वाटपाचे आदेश जमाबंदी आयुक्त यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कळविले आहे. ग्रामसभांमधून शेतकऱ्यांच्या खाते उताऱ्याचे वाचन होणार आहे. वर्षभर मंजूर विनातक्रार फेरफार नोंदीची माहिती ही ग्रामसभेला द्यावी लागणार आहे. डिजिटल सातबारे देण्यास सरकारने यापुर्वीच परवानगी दिलेली आहे. 2 ऑक्टोंबर पासून या मोहिमेला राज्यात सुरवात करण्यात आलेली आहे.

ई-पीक पाहणीचीही जनजागृती

डिजिटलच्या अनुशंगाने राज्यात अजून एक महत्वाचा उपक्रम सुरु आहे तो म्हणजे ई-पीक पाहणी. शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकाची माहिती या ई-पीक पाहणी अॅपवर नोंदवायची आहे. शेतकऱ्यानेच ही माहिती अॅपवर भरायची असून या अत्याधुनिक प्रणाली वापराची माहिती शेतकऱ्यास होणार आहे. 15 ऑक्टोंबर पर्यंत ही माहीती अदा करणे आवश्यक आहे. त्यानुसार या डिजिटल सातबारा वाटपाच्या दरम्यान याची जनजागृती करण्याचे अवाहन करण्यात आलेले आहे.

किसान क्रेडिट कार्ड मिळवण्याची प्रक्रिया

KCC मिळवणे सोपे आहे, यासाठी आधी https://pmkisan.gov.in/ या अधिकृत साईटवर जा आणि इथून किसान क्रेडिट कार्ड फॉर्म डाऊनलोड करा. तुम्हाला हा फॉर्म तुमच्या जमिनीची कागदपत्रे, पीक तपशीलांसह भरावा लागेल. येथे तुम्हाला हे सांगावे लागेल की तुम्ही इतर कोणत्याही बँक किंवा शाखेतून इतर कोणतेही किसान क्रेडिट कार्ड बनवले नाही. यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा, त्यानंतर तुम्हाला संबंधित बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड मिळेल.

KCC साठी आवश्यक कागदपत्रे

ओळखपत्रासाठी, तुमच्याकडे मतदार ओळखपत्र / पॅन कार्ड / पासपोर्ट / आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मतदार ओळखपत्र / पासपोर्ट / आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स हे अॅड्रेस प्रूफ म्हणून पाहिले जाते. (Farmers to get seven digital signatures, state government initiative)

संबंधित बातम्या :

तूर लागवडीत महाराष्ट्र आघाडीवर, काय तूराचे फायदे अन् लागवड प्रक्रीया जाणून घ्या..

राजकीय स्वा:र्थासाठी कृषी कायद्याला विरोध, पंतप्रधान मोदींनी विरोधकांना सुनावले खडे बोल

केळीची गोडी वाढली, आवक घटल्याने दरात वाढ

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.