सब्र का फल मीठा होता है..! कापूस उत्पादकांच्याच हातामध्ये कापसाचे दर

| Updated on: Nov 09, 2021 | 12:11 PM

शेतीमाल आणि बाजारपेठेत ठरवले जाणारे दर दोन्ही गोष्टींचा संबंध जवळचा असला तरी प्रत्यक्षात शेतीमालाचे दर ठरवताना शेतकऱ्यांचा रोल कहीच राहत नाही. पण गरज निर्माण झाल्यास काहीही होऊ शकते हे सध्याच्या कापसाच्या दरावरुन लक्षात येत आहे. कारण बाजारपेठेत कापसाच्या मागणीत दिवसागणिस वाढ होत आहे. सप्टेंबरमध्ये 5200 रुपये प्रतिक्विंटल असलेला कापूस आज 9200 च्या घरात आलेले आहेत.

सब्र का फल मीठा होता है..! कापूस उत्पादकांच्याच हातामध्ये कापसाचे दर
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : शेतीमाल आणि बाजारपेठेत ठरवले जाणारे दर दोन्ही गोष्टींचा संबंध जवळचा असला तरी प्रत्यक्षात (Agricultural Prices) शेतीमालाचे दर ठरवताना शेतकऱ्यांचा रोल कहीच राहत नाही. पण गरज निर्माण झाल्यास काहीही होऊ शकते हे सध्याच्या (Cotton Rate) कापसाच्या दरावरुन लक्षात येत आहे. कारण बाजारपेठेत कापसाच्या मागणीत दिवसागणिस वाढ होत आहे. सप्टेंबरमध्ये 5200 रुपये प्रतिक्विंटल असलेला कापूस आज 9200 च्या घरात आलेले आहेत. शिवाय मागणीत वाढ आणि त्या तुलनेत होणारा पुरवठा यामध्ये तफावत असल्याने भविष्याच कापसाचे दर वाढणार तर आहेतच पण शेतकऱ्यांनी कापूस विक्रीची गडबड न करता टप्प्याटप्प्याने विक्री करणे फायद्याचे राहणार असल्याचा सल्ला महेश सारडा कॅाटन असोसिएशनचे अध्यक्ष यांनी दिला आहे.

यंदा पावसामुळे कापसाच्या उत्पादनावर परिणाम झालेला आहे. शिवाय कापसाचे क्षेत्रही घटले होते. असे असताना आता जगभरातून कापसाची मागणी होत आहे. उत्पादन कमी आणि मागणी अधिक असल्याने कापसाच्या दरात वाढ होत आहे. शिवाय भविष्यात यापेक्षा अधिकचा दर मिळणार असल्याचे संकेत व्यापाऱ्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे लागलीच कापसाची विक्रीही करु नये आणि सर्वच साठवणुकही करु नये टप्प्याटप्प्याने विक्री करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला जात आहे.

कापूस उत्पादक देशांमध्येच पुरवठा घटला

भारताबरोबरच बांग्लादेश, पाकिस्तान, चीन, अमेरिका ही कापूस उत्पादक देश आहेत. मात्र, या देशांमध्येही कापसाचे उत्पादन हे घटलेले आहे. शिवाय कोरोना काळात उत्पादन घटले तर मागणी वाढली होती. त्यामुळे कापसाचा साठाही शिल्लक नाही. आता कोरोनानंतर सर्वकाही सुरु होत आहे. पण कापसाचे उत्पादनच घटल्याने उद्योगाची गाडी अणखीनही रुळावर आलेली नाही. शिवाय यंदा देशात पावसामुळे उत्पादनात घट झाली आहे तर लागवड क्षेत्रही कमीच होते. भारतासारख्या कापूस उत्पादक देशांमध्ये 20 टक्क्यांनी पुरवठा घटला आहे तर देशांतर्गत दररोज दीड लाख गाठींचा उठाव होत आहे.

उत्पादनात झाली घट

देशातही उत्तर भारतात कापूस हंगाम संपला आहे. उत्तर भारतासह मध्य भारतात कापूस पिकात गुलाबी बोंड अळीचा शिरकाव झाला आहे. यापूर्वी महाराष्ट्र, गुजरातमध्ये अतिपावसाने कापूस पिकाची मोठी हानी झाली. यामुळे कापसाचे उत्पादन देशात 335 ते 340 लाख गाठी एवढेच येवू शकते, असाही अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत. पावसामुळे उत्पादनावर तर परिणाम झालाच आहे पण यंदा मराठवाड्यात कापसाचे क्षेत्रही घटले होते. केवळ मराठवाड्यातच नाही तर देशभर हेच चित्र आहे. त्याचा परिणामही उत्पादनावर झालेला आहे.

एकाच वेळी आवक वाढली तर…

देशातील उत्तर भारतामधील हंगाम अंतिम टप्प्यात आहे. शिवाय प्रतिकूल परस्थितीमध्येही उत्पादन बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले आहे. बाजारपेठे मागणी वाढत असल्याने अचानक आवक वाढली तर त्याचा परिणाम दरावर होणार आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांनी टप्प्याटप्प्याने विक्री करणे हेच फायद्याचे राहणार आहे. शिवाय यामुळे दर टिकून राहतील आणि भविष्यात यापेक्षाही अधिकचा दर मिळेल.

संबंधित बातम्या :

विनापरवाना कारखाना सुरु, ‘स्वाभिमानी’चे कारखान्यातच आंदोलन

…म्हणून गव्हाच्या पेऱ्यात घट, शेतकऱ्यांनी निवडला वेगळा पर्याय

नांदेड जिल्ह्यातील विमा परताव्याचा मार्ग अखेर मोकळा, प्रक्रिया सर्वात अगोदर परतावा शेवटी..!