शेतकऱ्यांकडून 1 लाख एकर क्षेत्रात धानाच्या जागी इतर पिकांची लागवड, आता एवढी कमाई होणार

| Updated on: Sep 19, 2021 | 6:27 PM

काही शेतकरी फळबाग आणि भाजीपालाही पिकवत आहेत. द ट्रिब्यूनच्या बातमीनुसार, सूत्रांचे म्हणणे आहे की, राज्य सरकारच्या योजनेंतर्गत मिळालेल्या 7000 रुपयांमुळे एवढ्या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी भात सोडून इतर पिकांची लागवड केलीय.

शेतकऱ्यांकडून 1 लाख एकर क्षेत्रात धानाच्या जागी इतर पिकांची लागवड, आता एवढी कमाई होणार
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

नवी दिल्लीः हरियाणा सरकार पाणी वाचवण्याच्या उद्देशाने खरीप हंगामात धानाऐवजी इतर पिके घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत आहे, यासाठी एक योजनाही सुरू केलीय. आता त्याचे परिणाम समोर येत आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी सुमारे 1 लाख एकरात धानाऐवजी इतर पिकांची लागवड केली. राज्य सरकारच्या ‘मेरा पानी, मेरी विरासत’ योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना एकरी 7000 रुपये दिले जातील.

खरीप हंगामासाठीची आकडेवारी 2021 हे दर्शविते की, शेतकरी पाणी वाचवण्यासाठी धानाऐवजी मका किंवा डाळीसारखी पर्यायी पिके पेरत आहेत. काही शेतकरी फळबाग आणि भाजीपालाही पिकवत आहेत. द ट्रिब्यूनच्या बातमीनुसार, सूत्रांचे म्हणणे आहे की, राज्य सरकारच्या योजनेंतर्गत मिळालेल्या 7000 रुपयांमुळे एवढ्या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी भात सोडून इतर पिकांची लागवड केलीय.

या योजनेअंतर्गत सिरसामध्ये जास्तीत जास्त लागवड

सिरसा जिल्ह्यात धान नसलेल्या पिकांसाठी मेरी पाणी, मेरी विरासत योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 16,563 एकर जमिनीची नोंदणी करण्यात आली आहे. त्यानंतर फतेहाबाद (12,187 एकर), हिसार (11,471 एकर), जिंद (11,373), यमुनानगर (6,762) आणि कैथल (6,647 एकर) आहे. या योजनेला शेतकऱ्यांमध्ये उत्साहवर्धक पाठिंबा मिळाला आहे. याच कारणामुळे राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये लागवड करण्यात आली आहे.

अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी आणि शेतकरी कल्याण) सुमिता मिश्रा यांनी दावा केला की, गेल्या दोन वर्षांत या योजनेच्या नेत्रदीपक यशानंतर आता राज्य सरकार येत्या काही वर्षांत या योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार करेल. ते म्हणाले, ‘मेरा पानी, मेरी विरासत’ हरियाणामध्ये एका जनआंदोलनाचे रूप धारण करत आहे, ज्यामध्ये अधिकाधिक शेतकरी या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पुढे येत आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत 2000 एकर क्षेत्र वाढले

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी गेल्या वर्षी भात लागवड कमी करण्यासाठी आणि पिकांमध्ये वैविध्य आणण्यासाठी ही योजना सुरू केली होती. गेल्या वर्षी या योजनेअंतर्गत सुमारे 96,000 हजार एकर जमिनीवर धानाच्या जागी इतर पिकांची लागवड करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 46 कोटी रुपयांची प्रोत्साहन रक्कमही देण्यात आली. हरियाणामध्ये यावेळी शेतकऱ्यांनी 98000 एकर जमिनीवर धान वगळता डाळी, भाजीपाला आणि बागायती पिकांची लागवड केली आहे. सुरुवातीला ही योजना राज्यातील केवळ 8 ब्लॉकमध्ये सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांकडून मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता संपूर्ण हरियाणामध्ये याची अंमलबजावणी करण्यात आली.

संबंधित बातम्या

तुम्ही दोन घरांचे मालक आहात का? आयकरात सूट मिळवण्यासाठी हे महत्त्वाचे नियम जाणून घ्या

घर खरेदीची मोठी संधी, सणासुदीच्या काळात ‘या’ 4 बँकांनी गृहकर्जाचे दर केले कमी, पटापट तपासा

Farmers will cultivate other crops in place of paddy in an area of 1 lakh acres