Fisheries : मत्सपालनाने यांचे बदलले नशीब, आता घेत आहेत लाखो रुपयांचे उत्पन्न

जिल्ह्यातील मत्सपालन कार्यालयात गेले. सरकारी योजनांची माहिती घेतली. त्यानंतर मत्सपालन व्यवसाय सुरू केला.

Fisheries : मत्सपालनाने यांचे बदलले नशीब, आता घेत आहेत लाखो रुपयांचे उत्पन्न
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 5:42 PM

नवी दिल्ली : देशातील ग्रामीण भागातील शेतकरी शेतीसोबतच मत्सपालन व्यवसाय करतात. यामुळे लाखो शेतकऱ्यांची उपजीविका सुरू आहे. देशातील लाखो शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय हा मत्सपालन आहे. विशेषत अशी की हे लोकं दुसऱ्यांनाही मत्सपालनाचे धडे देतात. झारखंड राज्यातील पश्चिमी सिंहभूम जनपद येथील चक्रधरपूरमध्ये राहणारे बालवीर सेन. बालवीर सेन दुसऱ्या राज्यात खासगी नोकरी करत होते. परंतु, त्यांचा घरखर्च चालत नव्हता. त्यामुळे त्यांना व्यवसाय करण्याची कल्पना सूचली. मत्सपालनाची माहिती त्यांनी घेतली. जिल्ह्यातील मत्सपालन कार्यालयात गेले. सरकारी योजनांची माहिती घेतली. त्यानंतर मत्सपालन व्यवसाय सुरू केला.

मत्सविक्री दुसऱ्या राज्यात होते

मत्सपालन त्यांनी बायोफ्लॉक पद्धतीने केले. पंतप्रधान मत्स योजनेतून त्यांना अनुदान मिळाले. आता ते मत्सपालनातून चार ते पाच लाख रुपये कमवत आहेत. त्यांनी उत्पादित केलेल्या मासोळ्या दुसऱ्या राज्यातही विक्री केल्या जात आहेत.

हे सुद्धा वाचा

मत्सपालन फायद्याचा व्यवसाय

चाईबासा येथे राहणारे राजकुमार मुंडा यांनी मत्सपालन सुरू केले. राजकुमार मुंडा यांनी पंतप्रधान मत्स संपदा योजनेअंतर्गत मत्सपालन सुरू केले. त्यांनीही बायोफ्लॉक पद्धतीचा वापर केला. त्यांच्या कृत्रीम तलावात कितीतरी पद्धतीच्या मासोळ्या आहेत.

मुलांना चांगले शिक्षण देता आले

राजकुमार मुंडा यांचे म्हणणं आहे की, प्रत्येक टँकमधून ५ ते ६ क्विंटल मासोळ्यांचे उत्पादन होते. यातून त्यांना लाखो रुपयांची कमाई होते. त्यांचं म्हणणं आहे की, मत्सपालनातून मिळालेल्या पैशातून ते त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण देऊ शकतात. राजकुमार मुंडा यांचं ऐकलं तर मत्सपालन फायद्याचा व्यवसाय आहे.

महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात मत्सव्यवसाय विभागाचा महत्त्वाचा वाटा आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातील लोकांकरिता रोजगार मिळण्यासाठी मत्सव्यवसाय क्षेत्र महत्त्वाचा आहे. आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे. मत्सव्यवसायाचा विकास करावा, हा या विभागाचा उद्देश आहे.

मत्सव्यवसाय क्षेत्रामुळे आर्थिक मागासवर्गीयास रोजगार, स्वस्त आणि पोषक अन्न उपलब्ध होते. देशाला परकीय चलन प्राप्त होते.

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.