मुक्तसंचार पद्धतीचे कोंबडी पालन बघीतलं का?, काय असतात त्याची गणित समजून घ्या

मुक्तसंचार करणाऱ्या कोंबड्यांचा व्यवसाय ग्रामीण भागासाठी वरदान ठरू शकतो. कोंबड्यांची संख्या कमी ठेवून अंड्यांचे उत्पादन घेतले जाते. त्यानंतर मांसासाठी अंडे तयार केले जाऊ शकतात.

मुक्तसंचार पद्धतीचे कोंबडी पालन बघीतलं का?, काय असतात त्याची गणित समजून घ्या
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 5:51 PM

जयपूर : हळदीचा उपयोग अनेक वर्षांपासून औषधीसाठी करतात. यात कुरकमीन तत्व असतो. त्यामुळे हळदीचा रंग पिवळा होतो. याचा उपयोग अल्सर, पोटाच्या विकारात होतो. प्रगतशील शेतकरी भगवान रौत म्हणतात, पारंपरिक शेती करत असताना शेतीत प्रयोग करण्याचा विचार त्यांच्या डोक्यात आला. वागधरा संस्थानात त्यांनी शेतीसंदर्भात माहिती घेतली. जैविक शेतीचे फायदे त्यांनी समजून घेतले. हळदीच्या चांगल्या उत्पादनासाठी ते शेणाचा वापर करतात. हळदीसोबत ते गहू, मक्का याचीही शेती करतात. हळदी पावडर करून ते विकतात. यामुळे त्यांना चांगला फायदा होतो. प्रतिकिलो ४०० रुपये हळदी विकतात. १० किलो हळदीचे त्यांना चार हजार रुपये मिळाले.

मुक्तसंचार पद्धतीने कोंबडी पालन

मुक्तसंचार करणाऱ्या कोंबड्यांचा व्यवसाय ग्रामीण भागासाठी वरदान ठरू शकतो. कोंबड्यांची संख्या कमी ठेवून अंड्यांचे उत्पादन घेतले जाते. त्यानंतर मांसासाठी अंडे तयार केले जाऊ शकतात. डुंगरपूर जिल्ह्यातील साबला तहसीलीतील सागोट गावातील आदिवासी भगवान जगला रौत या शेतकऱ्याने मुक्तसंचार पद्धतीने कोंबड्यांचे पालन केले.

हे सुद्धा वाचा

वागधरा संस्थानात घेतले प्रशिक्षण

५५ वर्षीय भगवान रौत यांनी शेतीत मुक्तसंचार पॅटर्न सुरू केला. तरुण असताना ते गुजरातला गेले होते. पण, आता वय झाल्याने त्यांना काम मिळत नव्हते. म्हणून तीन कोंबड्या घेऊन त्यांनी कोंबडीपालनाचा व्यवसाय सुरू केला. वागधारा संस्थानात भगवान यांनी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांना ३०० कोंबड्या देण्यात आल्या. दशपर्णी औषध, कंपोस्ट बेड आणि शेतीसाठी अवजारे दिली. आता त्यांच्याकडे १२० कोंबड्या आहेत. मुक्तसंचार असल्याने कोंबड्यांचे आरोग्य चांगले राहते. मृत्यूदर कमी होते.

शेतात ३० बाय १० चा शेड

घराजवळील शेतीत त्यांनी ३० बाय १० चा शेड तयार केला. कोंबड्यांना बसण्यासाठी व्यवस्था केली. शेडच्या चारही बाजूला ५ फूट उंच ताराची जाडी लावली. शेतात काही झाडं लावली. शेतात मेथी लावली. विहीर असल्याने तिथं पाण्याची काही कमतरता नाही. १२० कोंबड्यांना रोज दहा ते बारा किलो स्टार्टर, तीन किलो गव्हाचा आटा, गहू तसेच उन्हाळ्यात कांदे बारीक करून कोंबड्यांना दिले जातात. दर महिन्याला दोन ते तीन हजार रुपये खान्यावर खर्च होते.

रोज ३० ते ४० अंडे मिळतात. गावठी कोंबड्या असल्याने एक अंडा १५ रुपयांना जातो. दर महिन्याला पाच ते दहा कोंबड्या विकतात. त्यातून दहा ते पंधरा हजार रुपये महिन्याला मिळतात. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मुक्तसंचार पद्धतीच्या कोंबड्या चांगला पर्याय आहे.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.