AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Black Rice Farming: 500 रुपये किलो विकतो हा तांदुळ, शेती कराल तर व्हालं लखपती

शेतकरी काळ्या धानाची लागवड करत असतील, तर त्यांना अधिक नफा मिळतो. कारण काळा धान बासमती पेक्षा महाग विकतो.

Black Rice Farming: 500 रुपये किलो विकतो हा तांदुळ, शेती कराल तर व्हालं लखपती
| Updated on: Jun 27, 2023 | 3:33 PM
Share

नवी दिल्ली : बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगालसह अन्य काही राज्यात शेतकरी धानाच्या शेतीत संघर्ष करत आहेत. कोणी बासमती राईस लावतो, तर कोणी मंसुरी आणि हायब्रीड जातीची नर्सरी लावत आहेत. शेतकऱ्यांचं म्हणणं अस आहे की, पारंपरिक शेतीत उत्पादन नाहीच्या बरोबर होते. खर्चाच्या तुलनेत फारसा फायदा मिळत नाही. परंतु, आता शेतकऱ्यांना टेंशन घेण्याची गरज नाही. शेतकरी काळ्या धानाची लागवड करत असतील, तर त्यांना अधिक नफा मिळतो. कारण काळा धान बासमती पेक्षा महाग विकतो.

देशात काळ्या धानाची मागणी वाढत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने पैसेवाले लोकं जास्त रक्कम देऊन काळा धान खरेदी करत आहेत. कारण काळे धान खाल्याने मधुमेह नियंत्रणात राहते. काळा धान रक्तदाबाच्या रोगावरही रामबाण उपाय आहे. नेहमी काळे धान खाल्ल्यास शरीर स्वस्थ राहते. शिवाय शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. शेतकरी काळ्या धानाची लागवड करत असतील, तर चांगली कमाई करू शकतात.

या राज्यांत होते काळ्या धानाची शेती

काळ्या धानाची शेती आसाम, सिक्कीम, मणीपूरमध्ये होते. परंतु, आता मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातही शेतकरी काळ्या धानाची लागवड करत आहेत. इंग्रजीत या धानाला ब्लॅक राईस म्हटलं जातं. शिजवल्यानंतर काळ्या धानाचा रंग बदलतो. या धानाची शेतीसुद्धा सामान्य धानासारखीच केली जाते. काळ्या धानाच्या शेतीची सुरुवात चीनमध्ये झाली. यानंतर भारतात सुरुवातीला आसाम आणि मणीपूरमध्ये काळ्या धानाची लागवड करण्यात आली.

असे तयार होतात काळे धान

काळ्या धानाची नर्सरी लावल्यानंतर १०० ते ११० दिवसांत काळे धान तयार होतात. या रोपांची लांबी सामान्य धानापेक्षा जास्त असते. याच्या धानाचे दाणे लांब असतात. शेतकरी काळ्या धानाची लागवड करत असतील तर उत्पादनात वाढ होते. सामान्य तांदुळ बाजारात ५० ते ६० रुपये किलो विकले जाते. एक किलो काळे तांदुळ २०० ते २५० रुपये किलो विकले जातात. सेंद्रीय पद्धतीने याची शेती केल्यास दुप्पट रेट मिळतात. त्यामुळे काळ्या धानाची लागवड करा. आरोग्य सुधारा आणि पैसे कमवा.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.