AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकरी होणार मालामाल! केंद्राचा मोठा निर्णय, ऊसाच्या FRP मध्ये वाढ; एका टनाला इतके रुपये मिळणार

Sugarcane FRP : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 2026-27 हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी FRP वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एका टनाला किती दर मिळणार याबाबत माहिती जाणून घेऊयात.

शेतकरी होणार मालामाल! केंद्राचा मोठा निर्णय, ऊसाच्या FRP मध्ये वाढ; एका टनाला इतके रुपये मिळणार
Sugarcane FRPImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 06, 2026 | 4:24 PM
Share

संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 2026-27 हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी FRP वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सुमारे 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि 5 लाख साखर कारखाना कर्मचाऱ्यांसह कृषी क्षेत्राशी संबंधित कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, भारतातील कापूस क्षेत्रातील अडचणी, घटती वाढ आणि गुणवत्तेच्या समस्या दूर करण्यासाठी 2026-27 ते 2030-31 या कालावधीसाठी 5,659.22 कोटी रुपयांचा कापूस उत्पादकता मिशन फंड देखील मंजूर करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ऊसाचा FRP किती वाढला?

2026-27 (ऑक्टोबर–सप्टेंबर) हंगामासाठी ऊसाचा FRP 365 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे. हा दर मागील वर्षाच्या 355 रुपयांपेक्षा 2.81% अधिक आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना एका टनामागे 100 रुपये जास्त मिळणार आहेत. यंदा उसाचा दर प्रति टन 3650 रुपये असणार आहे. हा दर 10.25% बेस रिकव्हरी दरावर लागू होईल. रिकव्हरी 10.25% पेक्षा जास्त असल्यास प्रत्येक 0.1% वाढीसाठी 3.56 रुपये प्रति क्विंटल प्रिमियम मिळेल, तर रिकव्हरी कमी असल्यास प्रत्येक 0.1% घटीसाठी 3.56 रुपये कपात केली जाईल. सरकारने असेही स्पष्ट केले आहे की, जर साखर कारखान्यांची रिकव्हरी 9.5% पेक्षा कमी असेल, तर कोणतीही कपात केली जाणार नाही. अशा शेतकऱ्यांना 338.3 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल.

उत्पादन खर्चाच्या दुप्पट दर

2026-27 हगांमासाठी ऊसाचा उत्पादन खर्च (A2+FL) 182 रुपये प्रति क्विंटल ठरवण्यात आला आहे. याच्या तुलनेत FRP 365 रुपये असून तो उत्पादन खर्चाच्या सुमारे 100.5% अधिक आहे. ऊसाचा दर वाढवल्यामुळे साखर कारखान्यांचा खर्च वाढला आहे. त्यामुळे सरकारने साखरेच्या किमान दरात (MSP) आणि एथनॉलच्या किमतीत वाढ करावी, अशी मागणीही कारखान्यांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी कर्नाटकमध्ये रब्बी 2026 हंगामासाठी किमान आधारभूत किंमतीवर (MSP) 9,023 टन सूर्यफूल खरेदीस मंजुरी दिली आहे. तर महाराष्ट्रात रब्बी 2025-26 हंगामात हरभऱ्याच्या खरेदीची कमाल मर्यादा वाढवून 8,19,882 टन करण्यात आली आहे. या निर्णयांमुळे शेतकऱ्यांना सुमारे 4,886.46 कोटी रुपयांची MSP सुरक्षा मिळणार आहे. याचा फायदा हजारो शेतकऱ्यांना होणार आहे.

Follow Us
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच