आनंदवार्ता : अखेर सोयाबीनचे दर स्थिरावले, शेतकऱ्यांसाठी आता महत्वाचा टप्पा

| Updated on: Dec 01, 2021 | 1:52 PM

तीन दिवसांपूर्वी सोयाबीनचे दर हे 6 हजार 500 रुपये क्विंटल असे होते. यामध्ये वाढ होऊन लवकरच 7 हजाराचा टप्पा पार करणार असेच वातावरण बाजारपेठेतले असताना दोन दिवसांमध्ये तब्बल 400 रुपयांची घसरण झाली होती. त्यामुळे आजच्या (बुधावरच्या) दराकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. पण 6 हजार 100 रुपयांवर सोयाबीन हे स्थिरावले आहे.

आनंदवार्ता : अखेर सोयाबीनचे दर स्थिरावले, शेतकऱ्यांसाठी आता महत्वाचा टप्पा
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : हंगामाच्या सुरवातीपासूनच (Soybean rate) सोयाबीनच्या दरात चढ-उतार राहिलेला आहे. शिवाय खरीप हंगामातील हे मुख्य पीक असून याच्या उत्पादनावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. तीन दिवसांपूर्वी सोयाबीनचे दर हे 6 हजार 500 रुपये क्विंटल असे होते. यामध्ये वाढ होऊन लवकरच 7 हजाराचा टप्पा पार करणार असेच वातावरण बाजारपेठेतले असताना दोन दिवसांमध्ये तब्बल 400 रुपयांची घसरण झाली होती. त्यामुळे आजच्या (बुधावरच्या) दराकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. पण 6 हजार 100 रुपयांवर सोयाबीन हे स्थिरावले आहे. किमान दरात घसरण तरी झाली नाही यामध्ये ( relief to farmers) शेतकरी समाधान मानत आहे.

सोयाबीनच्या दरात चढ-उतार झाले तरी त्याचा आवकवर काही परिणाम झाला नव्हता. दर वाढले म्हणून आवक कधी वाढली नाही तर कमी झाले म्हणून आवक घटली नाही. शेतकऱ्यांनी गरज असेल तेव्हाच सोयाबीनची विक्री केलेली आहे. मागणी असतानाही पुरवठा होत नसल्यानेच मध्यंतरी सोयाबीनचे दर हे 6 हजार 700 पर्यंत गेले होते. आता मात्र, दर घटत असताना शेतकऱ्यांनी योग्य भूमिका घेणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांना आता योग्य निर्णय घेण्याची वेळ

आतापर्यंत सोयाबीनच्या दराबाबत सर्वकाही पोषक होते मात्र, आता सोयापेंडच्या आयातीचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. कोरोनाच्या नविन विषाणूमुळे निर्यातीस अडचणी निर्माण होत आहेत. या सर्व बाबींचा विचार करुन आता शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक न करता गरजेप्रमाणे विक्री करणे आवश्यक आहे. गतवर्षीप्रमाणे सोयाबीनला 10 हजाराचा दर मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र, सध्याचे वातावरण पाहता सोयाबीन विक्रीच शेतकऱ्यांसाठी फायद्याची राहणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.

तरही केवळ 9 हजार पोत्यांचीच आवक

गेल्या दोन दिवसांपासून सोयाबीनच्या दरामध्ये घसरण सुरु आहे. आता अशीच घसरण कायम राहून दर कमी होतील याची धास्ती अद्यापही शेतकऱ्यांनी घेतलेली नाही. कारण बुधवारी लातूरच्या कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ 9 हजार पोत्यांची आवक झाली होती. आतापर्यंत शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केल्यानेच दर वाढला होता. पण सध्या जागतिक बाजारपेठेतील वातावरण पाहता शेतकऱ्यांनी आहे त्या दरामध्ये टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करणे फायद्याचे राहणार आहे. ऐन हंगामामध्ये लातूरच्या कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये 50 ते 60 हजार पोत्यांची आवक असते यंदा मात्र, सुरवतीपासूनच शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या साठवणूकीवर भर दिला होता. त्यानुसार आता दर आहे. योग्य वेळी निर्णय घेतला नाही तर भविष्यात कवडीमोलाने सोयाबीन विक्रीची नामुष्की येऊ नये म्हणजे झालं

नव्या तुरीचेही बाजारात आगमन

खरीप हंगामातील तूर हे शेवटचे पीक असते. खरीपातील सर्वच पिकांवर पावसाचा आणि अतिवृष्टीचा परिणाम झाला होता. पण तुरीचे अतिम टप्प्यात ढगाळ वातावरणामुळे नुकसान झाले होते. मात्र, हे नुकसान कमी प्रमाणात असल्याने तुरीला चांगला उतार मिळालेला आहे. खरिपातील तूर बाजारात दाखल होत असून 9 हजारापर्यंत दर मिळत आहे. मागणीप्रमाणे आवक असली तरी तुरीचे दर हे सध्या स्थिर आहेत. आवक कमी झाली तर सोयाबीन प्रमाणेच दरामध्ये कमी-अधिक प्रमाणात बदल होतील असा अंदाज व्यापारी अशोक आग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या :

अवकाळीची अवकृपा फळबागांवर, वातावरणातील बदलामुळे शेतकरी मेटाकूटीला

सोयाबीनच शेतकऱ्यांना तारणार, तुरीची आवक वाढल्याने दरात घसरण

खरीप-रब्बी नंतर आता अवकाळीचा फळबागांनाही फटका, देवगड हापूसच्या उत्पादनात निम्म्याने घट