अनुदानित बियाणे विक्रेत्यांकडे उपलब्ध, या कागदपत्रांची पूर्तता करा अन् बियाणे घ्या..!

| Updated on: Nov 02, 2021 | 5:55 PM

ब्बी हंगामामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियनांतर्गत (National Food Security Campaign) बियाणे महामंडळच्या वतीने यंदाच्या रब्बी हंगामासाठी अनुदानित दराने बियाणे (Seeds at subsidized rates) उपलब्ध केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात हे बियाणे मिळणार आहे.

अनुदानित बियाणे विक्रेत्यांकडे उपलब्ध, या कागदपत्रांची पूर्तता करा अन् बियाणे घ्या..!
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : रब्बी हंगामामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियनांतर्गत (National Food Security Campaign) बियाणे महामंडळच्या वतीने यंदाच्या रब्बी हंगामासाठी अनुदानित दराने बियाणे (Seeds at subsidized rates) उपलब्ध केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात हे बियाणे मिळणार आहे. यामध्ये ज्वारी, हरभरा, गहू अनुदानित दराने मिळणार आहेत मात्र, याकरिता शेतकऱ्यांना आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. प्रत्येक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळवून देणे शक्य नसल्याने लॅाटरी पध्दतीने शेतकऱ्यांची निवड केली जाते. निवड झालेल्या शेतकऱ्यांना सातबारा आणि आधार कार्डद्वारे महाबीजचे हे बियाणे मिळणार आहे.

महाबीज विक्रेते व उपविक्रेत्यांकडे सदर बियाणे उपलब्ध झाले आहेत. त्यासाठी लॉटरीमध्ये ज्यांची नावे आहेत, तसेच ज्वारी व हरभरा पिकांसाठी त्यांची नावे लॉटरीसाठी नोंदणी केली नसतील तर अशा शेतकऱ्यांनी त्यांचा सातबारा, आधार कार्डची झेरॉक्स प्रत देऊन महाबीज विक्रेते व उपविक्रेत्यांकडे अनुदानित दराने बियाणे घेता येतील. एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त क्षेत्रानुसार 5 एकरपर्यंतचे बियाणे अनुदानित दराने घेता येणार आहेत.

कागदपत्रांची करावी लागणार पूर्तता

ग्राम बीजोत्पादन योजनेअंतर्गत हरभरा व गहू बियाणे अनुदानित दराने मिळणार आहेत. अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना महाबीज विक्रेते व उपविक्रेत्यांकडे सातबारा, आधार कार्ड दिल्यानंतर अनुदानित दराने बियाणे उपलब्ध करून दिली जातील. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असेल.अनुदानित दराने चार किलोची ज्वारी बॅग, 20 किलोची हरभरा बॅग, 40 किलोची गहू बॅग उपलब्ध आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत प्रमाणित बियाणे वितरणाकरिता उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या अनुदानित बियाणांचा लाभ घेण्याचे अवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रथम लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यास प्राधान्य

ग्राम बिजोत्पादन योजनेअंतर्गत अनुदानीत दराने हरभरा जॅकी-9218 व गहु बियाणे एका एकर क्षेत्रासाठी अनुदानीत दराने बियाणे मिळेल. अनुसुचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांनी महाबीज विक्रेते व उपविक्रेते यांचेकडे सातबारा, आधारकार्ड झेरॉक्स प्रत देऊन महाबीज विक्रेता व उपविक्रेत्याकडून अनुदानीत दराने बियाणे खरेदी करावे. सदरील बियाणे उपलब्ध् असे पर्यंत अनुदानीत दराने दिले जाणार आहे. शिवाय प्रथम लाभ घेणाऱ्यासच प्राधान्य देण्यात येणार आहे.

असे आहेत अनुदानित दर

अनुदानीत दराने सु.ज्वारी, 4 किलोची बॅग, फुले रेवती किंमत रु. 120 प्रति बॅग फुले वसुधा, मालदांडी प्रति बॅग 124, परभणी मोती व परभणी ज्योती रु. 152 प्रति बॅग, हरभरा 20 किलो पॅकींगची राजविजय-202  व फुले विक्रम ,फुले क्रांती, एकेजी-1109 या वाणाची किंमत 1220 प्रति बॅग या दराने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत प्रमाणीत बियाणे वितरणा करीता उपलब्ध् आहे. तसेच ग्राम बिजोत्पादन योजनेअंतर्गत हरभरा जॅकी-9218 अंतर्गत 30 किलोची बॅग रु. 1650 प्रति बॅग प्रमाणे व गहु 10 वर्षा आतिल वाणाचे 40 किलो बियाणे रु. 920 प्रति बॅग उपलब्ध आहे. (In the subsidized seed market, complete the documents and take rabi seeds)

संबंधित बातम्या :

योजना शेतकऱ्यांच्या हिताची : प्लास्टिक मल्चिंगचे महत्व अन् 50 टक्के अनुदानाचा ‘असा’ घ्या लाभ…!

कडधान्यसाठा मर्यादेची मुदत संपली आता काय? सराकरचा उद्देश साध्य झाला का?

बाजार समिती बंद, तरीही 15 हजार क्विंटल शेतीमालाची आवक अन् अडीच कोटींचे व्यवहार