वांगी आणि टोमॅटो एकाच झाडाला लागलेलं पाहिलंय का? अजब संशोधनाची सर्वत्र चर्चा

| Updated on: Feb 10, 2021 | 5:28 PM

तुम्ही कधी वांग्याच्या झाडाला टोमॅटो आणि बटाट्याच्या रोपाला वांग लागलं असल्याचं पाहिलं आहे का? Indian vegetable research institute research tomato with Aubergine

वांगी आणि टोमॅटो एकाच झाडाला लागलेलं पाहिलंय का? अजब संशोधनाची सर्वत्र चर्चा
वांग्याच्या झाडाला टोमॅटो
Follow us on

लखनऊ: तुम्ही कधी वांग्याच्या झाडाला टोमॅटो आणि बटाट्याच्या रोपाला वांग लागलं असल्याचं पाहिलं आहे का? नसेल ना. पण, असं घडलंय. उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये शहनशाहूपरमध्ये असं झालं आहे. वांग्याच्या झाडाला टोमॅटो लागले आहेत. बटाटाट्याच्या झाडाल वांगी येत आहेत. भारतीय भाजी संशोधन संस्थेंमध्ये सुरु असलेल्या एका संशोधनानंतर अशा प्रकारची रोपं विकसित करण्यात आली आहे. या नव्या संशोधनाची सर्वत्र चर्चा होत आहे. (Indian vegetable research institute research tomato with Aubergine on one plant)

भारतीय भाजी संशोधन संस्थेचे प्रमुख डॉ. आनंद बहादूर सिह यांनी दिलेल्या माहितीनुसार रोपांचं ग्राफ्टिंग केल्यानंतर टोमॅटोच्या झाडांना वांग्याच्या रोपांचं कलम केलं जातं. आनंद बहादूर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार या विशेष रोपांना 24-28 डिग्री तापामानत 85 टक्के आद्रता आणि प्रकाशापासून दूर ठेवत रोपं तयार करण्यात आली होती. ग्राफ्टिंग आणि कलम केल्यानंतर 15-20 दिवसांनतर रोपांची लागवड शेतात केली जाते. यानंतर युरिया आणि पाणी दिलं गेले. यानंतर शेतीशी संबंधित कामं करावी लागतात. 60 ते 70 दिवसांनंतर या रोपांना फळ येण्यास सुरुवात होते.

आनंद बहादूर सिंह यांनी सांगितलं की ग्राफ्टिंग तंत्रज्ञानाची सुरुवात 2013-14 मध्ये सुरु झाली आहे. या तंत्रज्ञानाचा येत्या वर्षांमध्ये शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

टोमॅटो आणि वांग एकाचं झाडाला

शहरी भागातील नागरिकांसाठी फायदेशीर

शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी ताजा भाजीपाला मिळण्यासाठी नवा प्रयोग फायदेशीर आहे. शहरातील लोक टेरेस गार्डन द्वारे हा प्रयोग करुन एकाच झाडाला वेगवेगळा फळभाज्या मिळवू शकतात. नव्या तंत्रज्ञानामुळे संशोधकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. एकाच झाडाला वांगी आणि टोमॅटो हे परिसरातील नागरिकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे.

संबंधित बातम्या:

अकोल्याच्या शेतकऱ्याची काळ्या गव्हाची लागवड, बाजारपेठेत जास्त भाव, चांगल्या उत्पन्नाची आशा

कमी शेतीतही लाखोंची कमाई, बटाटा किंवा टॉमेटो नाही तर ‘स्ट्रॉबेरी’ची शेती, वाचा खास टिप्स

Colourful Cauliflower Farming | जांभळ्या-पिवळ्या फ्लॉवरची लागवड, नव्या प्रजातीचा फुलकोबी ‘भाव’ खाणार!

(Indian vegetable research institute research tomato with Aubergine )