Colourful Cauliflower Farming | जांभळ्या-पिवळ्या फ्लॉवरची लागवड, नव्या प्रजातीचा फुलकोबी ‘भाव’ खाणार!

या रंगीत फुलकोबीची लागवड करत उत्पादन घेणारा हा पहिलाच प्रयोग आहे.

Colourful Cauliflower Farming | जांभळ्या-पिवळ्या फ्लॉवरची लागवड, नव्या प्रजातीचा फुलकोबी 'भाव' खाणार!
रंगेबिरंगी फुलकोबी
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 12:59 PM

मालेगाव : शेतकरी म्हणजे नेहमीच संकटांचा सामना करणारा घटक (Malegaon Colourful Cauliflower Farming Story). कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी अस्मानी आणि सुलतानी संकटे नेहमीच शेतकऱ्यांच्या वाट्याला येतात. पण या संकटांवर मात करुन वेगवेगळे आणि नाविन्यपूर्ण प्रयोग आपल्या शेतात करुन शेतकरी पुन्हा उभा राहत असतो. असाच एक अनोखा प्रयोग केल्याने नाशिकच्या मालेगावात तालुक्यातील दाभाडी गावतील प्रयोगशील शेतकरी महेंद्र निकम यांनी केला आहे. तर काय आहे हा प्रयोग ज्यामुळे सगळीकडे निकम याची चर्चा होत आहे. तर चला पाहूया (Malegaon Colourful Cauliflower Farming Story)…

मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील तरुण शेतकरी महेंद्र निकम याने आपल्या शेतात अमेरिकेत संशोधित झालेल्या आणि पोषक द्रव्यांची अतिरिक्त मात्रा असलेल्या जांभळ्या आणि पिवळ्या रंगाच्या फुलकोबी (फ्लॉवर) शेतीच्या उत्पादनाचा यशस्वी प्रयोग केला आहे. या रंगीत फुलकोबीची लागवड करत उत्पादन घेणारा हा पहिलाच प्रयोग आहे. हे उत्पादन नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर आदी मेट्रो शहरांच्या मॉल्समध्ये विक्रीसाठी लवकरच दाखल होणार आहे. विशेष म्हणजे जांभळ्या आणि पिवळ्या रंगाच्या कोबीत सामान्य कोबीपेक्षा अधिक पोषक द्रव्य असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत असून ‘ व्हिटामीन-सी’ ची मात्रादेखील अधिक असल्याचा दावाही केला जात आहे.

Colourful Cauliflower

जांभळ्या पिवळ्या रंगाची फुलकोबी

आपल्या शेतात नेहमीच भाजीपाला लागवडीचे वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या निकम यांना पोषक द्रव्य असलेल्या जांभळ्या आणि पिवळ्या फुलकोबीच्या वाणाची माहिती त्यांना मिळाली. एका खाजगी बि-बियाणे कंपनीशी संपर्क करत त्यांनी बियाणे मागवले कंपनीचे तज्ञ आणि कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करुन मार्गदर्शन घेत या सेंद्रिय अशा जांभळ्या आणि पिवळ्या रंगाच्या फुलकोबीची 30 गुंठे क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर लागवड केली.

लागवडीनंतर 60 दिवसाच्या उत्पादन कालावधीत पीक आता बहरुन आल्याने काढणीला आलंय. आतापर्यंत राज्यात फक्त पांढऱ्या आणि हिरव्या फुलकोबीचे (ब्रोकोली) उत्पादन घेतले जातात. मात्र, या कोबीला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने या नव्या प्रजातीचा फुलकोबी मात्र ‘भाव’ खाणार आहे. पारंपरिक पांढऱ्या आणि हिरव्या कोबीपेक्षा किमान 20 रुपये किलो अधिकचा दर देण्याची तयारी खरेदीदारांनी त्यांना दाखवली असून शेतकरी निकम यांनी मेट्रो शहरातील मॉल्समध्ये विक्रीसाठी संपर्क देखील सुरु केला आहे. हजारोंच्या खर्चात लाखोंचे उत्पन्न यातून मिळणार असल्याचे शेतकरी निकम यांनी सांगितले.

महेंद्र निकम यांच्या या आगळ्यावेगळ्या शेती शिवाराला राज्याचे  कृषिमंत्री दादा भुसे यांनी भेट देऊन या नवीन प्रयोगाची पाहणी करत निकम यांच्या कडून याची माहिती घेतली , राज्य शासनाच्या ‘ पिकेल ते विकेल ‘ या योजनेअंतर्गत नाशिक आणि ठाणे येथे जांभळ्या आणि पिवळ्या कोबीसाठी स्टॉल उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन कृषिमंत्री दादा भुसे यांनी उत्पादक निकम यांना दिले आहे (Malegaon Colourful Cauliflower Farming Story).

पारंपारिक शेतीला फाटा देत आपल्याकडे असलेल्या शेत जमिनीचा योग्य उपयोग करत वेगवेगळे आणि अनोखा प्रयोग करत लाखोंचे उत्पन्न मिळवणे शक्य असल्याचे महेंद्र निकम या शेतकऱ्याने दाखवून दिले असून इतर शेतकऱ्यांनी ही निकम सारखे वेगवेगळ्या प्रयोग केले तर नक्कीच त्यांना फायदा होईल.

Malegaon Colourful Cauliflower Farming Story

संबंधित बातम्या :

KCC Scheme Linked Pm Kisan : PM KISAN SCHEME शी लिंक झाली KCC योजना, 175 लाख अर्ज मंजूर, जबरदस्त फायदा

शेती परवडत नाही म्हणता? मग रेशीम शेती करा, लाखो कमाईची हमी, सरकारकडून महारेशीम अभियान, वाचा सविस्तर

मोदी सरकारच्या गोबरधन योजनेची वेबसाईट लाँच, शेतकऱ्यांना 1 लाख कोटी मिळणार, वाचा संपूर्ण माहिती

Kisan Railway | किसान रेल्वे शेतमाल वाहतुकीमध्ये गेमचेंजर ठरेल?

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.