मोदी सरकारच्या गोबरधन योजनेची वेबसाईट लाँच, शेतकऱ्यांना 1 लाख कोटी मिळणार, वाचा संपूर्ण माहिती

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांनी येत्या पाच वर्षात गोबरधन पोर्टलद्वारे 1 लाख कोटींचं उत्पन्न मिळेल, असं म्हटलंय. gobardhan scheme website launch

मोदी सरकारच्या गोबरधन योजनेची वेबसाईट लाँच, शेतकऱ्यांना 1 लाख कोटी मिळणार, वाचा संपूर्ण माहिती
गोबरधन योजना

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारनं 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं उद्दिष्ठ ठेवलं आहे. त्या अंतर्गत केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत गोबरधन नावाचं पोर्टल लाँच करण्यात आलं आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय पशुपालन आणि डेअरी मंत्री गिरिराज सिंह, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते या पोर्टलंचं लाँचिंग करण्यात आले. गोबरधन पोर्टलवर भेट देण्यासाठी http://sbm.gov.in/gbdw20/ या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. (Modi Government launch Gobardhan Portal to buy cattle organic waste know how to earn money)

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांनी येत्या पाच वर्षात गोबरधन पोर्टलद्वारे 1 लाख कोटींचं उत्पन्न मिळेल, असं म्हटलंय. केंद्र सरकारनं गोबरधन योजनेची घोषणा 2018 मधील अर्थसंकल्पात घेतली होती.गोबरधन योजनेअंतर्गत गावामंध्ये पाळीव प्राण्यांच्या शेणापासून आणि इतर पदार्थापासून बनणाऱ्या पदार्थांपासून कंपोस्ट खत आणि बायो गॅस तयार करण्याचा उद्देश आहे. याद्वारे शेतकऱ्यांना कमाईबरोबर इतर संधी निर्माण होतील.

गोबरधन योजनेच्या पोर्टलवर सर्व माहिती

केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयानं गोबरधन पोर्टल लाँच केले आहे. जे शेतकरी बायोगॅस आणि इथेनॉलच्या उत्पादनाची माहिती घेण्यासाठी गोबरधन पोर्टलला भेट द्यावी लागेल. बायोगॅस प्लँट आणि इतर आर्थिक माहितीसाठी शेतकरी त्या पोर्टलवरुन सर्व माहिती घेऊ शकतात. त्याशिवाय राज्य सरकारच्या कृषीविषयक इतर योजनांची माहिती देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे.

नरेंद्रसिंह तोमर म्हणतात रोजगाराच्या संधी वाढणार

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी गोबरधन योजनेद्वारे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढतील. युवा शेतकरी अधिक कमाई करु शकतात, असं म्हटलंय. छत्तीसगड सरकारनं यापूर्वीच ही योजना लागू केली आहे. त्यांअतर्गत शेतकऱ्यांकडून शेणाची खरेदी केली जाते. छत्तीसगडमध्ये 2 रुपये किलोनं शेणाची खरेदी केली जाते. यामुळे शतेकऱ्यांना फायदा होत आहे. छत्तीसगड पाठोपाठ पंजाब आणि हरियाणा राज्यात गोबरधन योजना लागू करण्याची मागणी केली जात आहे.

हेही वाचा:

शिवसेना vs भाजप… शिवसेनेचं केंद्र सरकारविरोधात आंदोलन, तर भाजप वीज बिलाच्या मुद्यावर आक्रमक

दिशा पटानीची समुद्रकिनाऱ्यावर धमाल, चाहते म्हणाले…

ज्या एका निर्णयानं इंदिरा देशप्रिय झाल्या, तोच निर्णय मोदींनी हळूहळू कसा फिरवला?

(Modi Government launch Gobardhan Portal to buy cattle organic waste know how to earn money)

Published On - 8:37 am, Fri, 5 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI